कृषी सल्ला

या खरीप हंगामामध्ये घ्या मिरची ‘ चे ‘ हे वाण मिळेल भरघोस उत्पन्न!

Take this variety of chilli 'Che' in this kharif season and you will get a lot of income!

देशात अनेक शेतकरी मिरचीचे उत्पन्न घेत असतात.मिरची हा भारतातील खाद्य पद्धतीतील महत्त्वाचा घटक आहे.मिरचीचे पीक घेत असताना शेतकऱ्यांना अनेक मिरचीचे वाण माहीत नसतात. मिरचीचे उत्पादन घेत असताना अनेक प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव पिकावर होत असतो. या रोगांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.हवामानामध्ये होणारा बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे. मिरचीवरील होणारा रोगांपैकी चुरडा मुरडा रोग हा एक प्रकार.

पण शेतकऱ्यांना आता घाबरण्याचे काहीच कारण नाहीये कारण आयसीएआर (Indian Institute of Horticulture research, Bengaluru ) या संस्थेने मिरचीचा नवीन हायब्रीड वाणाचे संशोधन केले आहे. यामध्ये शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की चुरडा मुरडा रोग या वाहनाला लागत नाही.मिरची वर होणारा हा रोग विषाणूजन्य रोग असून या रोगाला कुठेही उपाय नाही, या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रमुख्याने मावा,तुडतुडे, पांढरी माशी, रस शोषणाऱ्या किडी मार्फत होत असल्याने त्यांना रोगाचे वाहक म्हणतात. या रोगांमध्ये मिरचीच्या पानाच्या गुठळ्या किंवा पानांचा आकार बदलून ते देठाकडे गुंडाळले जातात. झाडांची वाढ खुंटते मिरचीच्या अशा झाडांना फुले लागत नाहीत. फुलांचे फळात रूपांतर होत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे 90 टक्के पिकाचे नुकसान होते.

त्यामुळे पुढील खरीप हंगामासाठी आयसीएआर ने विकसित केलेल्या मिरचीचे वान शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने वापरावे. यामुळे चुरडा मुरडा रोग म्हणजेच बोकड्या या रोगाला आळा बसेल. तसेच मिरचीचा उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होऊन भरपूर फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button