कृषी सल्ला

शेतामध्ये ‘हे’ पिक घ्या; आणि मिळावा एका एकर मध्ये ‘सहा लाख’ रुपये कमावण्याची संधी!

Take ‘this’ crop in the field; And get a chance to earn 'six lakh' rupees per acre!

सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना व कार्यक्रम राबवत असते, या योजनेचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे (To increase the income of farmers) तसेच देशाचे उत्पादन वाढवणे हा असतो. भारत सरकारचे देखील 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे उद्दिष्ट असून त्याकरता विविध उपक्रम राबवित आहेत.

केंद्र सरकारचे (Of the Central Government) हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चिया बियाण्यासारखी पिकं मोठी मदत मिळू शकते. चिया बियाणे (Chia seed ) या पिकाला सुपर फूड (Super food) मानले जाते. ‘साल्व्हिया हिस्पॅनिका'(Salvia Hispanica) हे त्याचे शास्त्रीय नाव (Classical name) आहे. हे प्रामुख्यानं फुलांचं रोप आहे. चिया बियाणे हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे.

हेही वाचा : मोफत बियाणे मिळवण्यासाठी मोबाईलवर अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया…

[metaslider id=4085 cssclass=””]

परंतु चिया बियाणे अलीकडील काळामध्ये भारतात देखील लागवड केली जाते.मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यासह इतर काही भागात शेतकरी त्याची लागवड करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणि हळूहळू त्याचा विस्तार इतर राज्यांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.

चिया पिकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न यामधून मिळू शकते,(It can generate more income at a lower cost,) एक एकर जमिनीमधून सर्वसाधारणपणे सहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.भारतातील कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थान व्यतिरिक्त इतर अनेक राज्यांतील शेतकरी याची लागवड करत आहेत. पारंपारिक शेती सोडून, आधुनिक शेतीचा ध्यास धारणाऱ्याकरिता हा उत्तम पर्याय आहे.

याची लागवड पद्धत अत्यंत सोपी असून, यामध्ये दोन प्रकारे लागवड केली जाते, यामध्ये श्रम देखील कमी प्रमाणात लागतात. चिया बियाणे लागवड पूर्णपणे सेंद्रिय आणि सोपी आहे. याची पेरणी दोन प्रकारे केली जाते. सुमारे एक ते दीड किलो बियाण्याची फवारणी तंत्राद्वारे एक एकर शेतात पेरणी करता येते.

हेही वाचा : 75 वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढून, लासलगाव येथे कांद्याचा लिलाव वाचा सविस्तर बातमी…

दुसरी पद्धत म्हणजे रोपं तयार करुन त्याची लागवड करणे. प्रथम रोपवाटिकेत बियाण्याद्वारे रोप तयार करता येतात. त्यानंतर भातासारखी याची लावणी केली जाते. या पद्धतीत लावणी केल्यावर एक एकरात अर्धा किलो बियाणे वापरले जाते. फवारणीच्या पद्धतीमध्ये कष्ट कमी आणि बियाणं जास्त लागते. तर, लागण पद्धतीतं ज्यादा श्रम करावं लागतं.

थंड हवामान आणि डोंगराळ भाग वगळता संपूर्ण भारतात त्याची लागवड करता येते. कृषी तज्ञांच्या (Of agricultural experts) माहितीनुसार चिया बियाणेचे उत्पादन तपकिरी मातीत चांगले येते.

तसेच या पिकाला मागणीदेखील अधिक असल्याने चिया बियाणे विकायला बाजारात जाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगतात. लागण केल्यानंतर याची माहिती शेतकऱ्यांनी कंपन्यांना (Farmers to companies) दिली तर त्यांचे एजंट शेतातून खरेदी करतात. चिया बियाण्यांची किंमत सध्या 1000 रूपये आहे.

हेही वाचा :


1)घर बसल्या डिजिटल 8अ कसा काढाल? चला पटापट जाणून घ्या संपूर्ण माहिती, ज्यामुळे वाचेल तुमचा वेळ आणि पैसा…

2)HEALTH TIPS: आपल्याला निरगिलीचे आयुर्वेदिक फायदे माहिती आहेत का? वाचा निरगिलीचे महत्त्व…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button