
हवामान अंदाज – भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी दि. ९ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दि. ५ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे.
वाचा –
मार्गदर्शक सूचना-
कापलेल्या सोयाबीन पिकाची पुढील हंगामात बियाणे म्हणून वापर करावयाचा असल्यास मळणी करताना पावसाचा अंदाज लक्षात घ्यावा. त्यातील दाण्यातील ओलावा १३ ते१५ % असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच मळणी यंत्राचे फेरे ३५० ते ४०० प्रती मिनिट असताना सोयाबीनची मळणी करावी जेणेकरून सोयाबीनची उगवण क्षमता टिकून राहील.
कपाशी –
कपाशीतील बोडं भरण्याच्या अवस्थेत शेतकऱ्यांनी गुलाबी बोडं अळीच्या प्रादुभावाचे शेतातील झाडांचे २० हरवी बोंडे तोडून नरीक्षण करावे. कपाशीतील बोंडे कुजणे ही विकृती आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी स्ट्रेप्टोसायक्लीन २ + ५ ग्रॅम. कॉपर ऑक्झीक्लोराइड २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वाचा –
तूर –
तूर पिकातील पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाने बाधित झालेले तुरीची पाने व इतर भाग गोळा करून नष्ट करावे.
रब्बी ज्वारी पेरणी –
रबी ज्वारीच्या पेरणीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी व पेरणी पावसाची उघडीप पाहून करावी. पेरणीसाठी पिकेव्ही क्रांति, फुले यशोदा, मालदांडी ३५- १ यापैकी एका वाणाची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी.
सोयाबीन –
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन कापणीला आले आहे. सोयाबीनच्या शेंगांचा रंग बदललेला असल्यास त्वरित कापणी करावी जेणेकरून पररपक्व झाल्यावर शेंगा खाली पडणार नाहीत आणि उत्पन्नात घट होणार नाही. कापणी केलेला शेतमाल गोळा करून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किवा शेतात प्लास्टीक शीटने झाकून ठेवावा.
फळे – भाजीपाला –
वांगी-
या भाजीपाला पिकामध्ये फळे पोखरणाऱ्या अलयांच्या नियंत्रणासाठी एकरी ४-६ कामगंध सापळे लावावेत. फळे पोखरणाऱ्या आल्याणी आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास स्पिनोसॅड ३.० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मिरची-
मिरची पिकामध्ये मर किवा इतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईड या बुरशीनाशकाची २५० ते ३०० ग्रॅम प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी.
लिंबू-
लिंबू फळझाडांवर खैऱया रोगाचा फैलाव झपाट्याने होऊ नये म्हणून प्रादुर्भाव ग्रस्त पाने आणि फांद्या गोळा करून नष्ट कराव्यात. नंतर कॉपर ऑक्झीक्लोराईड १८० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन ६ ग्रॅम चे मिश्रण ६० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सीताफळ –
सीताफळ फळझाडावरील पिठ्या ढेकूणाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी क्लोरपायरीफॉस २० मिलि १० ग्रॅम धूण्याचे पावडर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशु व पक्षी –
रोगप्रतीकारशक्ती वाढण्यासाठी जनावरांना नियमित क्षार व जीवनसत्वांचा पुरवठा करावा. रोगप्रतीबंधक लसीकरण फक्त सशक्त पक्ष्यांना करावे. एका वेळी एका पक्षाला एकच लस टोचावी. एकाच वेळी दोन किवा तीन लस दिल्यास रोगप्रतीकारशक्ती तयार होणार नाही. उलट पक्ष्यात विपरीत परिणामामुळे नुकसान होईल.
विशेष सूचना –
रबी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी जमीन तयार करावी. जमीन तयार करताना जमीनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहील याची दक्षता घ्यावी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा