यंदा सोयाबीनला (soybeans) चांगला बाजारभाव मिळल्या कारणाने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी प्राधान्य दिले आहे, उत्पन्नातील जोखीम कमी (Risk reduction) करण्यासाठी अनेक शेतकरी सोयाबीनचे पिकामध्ये आंतरपीक (Intercrop) घेतात. यामध्ये, सोयाबीन बरोबरच तुरीची लागवड केली जाते, किंवा सोयाबीन बरोबर दुसऱ्या पिकास पसंती दिली जाते.
वाचा : पिकांवरील लष्करी आळीमुळे हैराण झाला आहात का तर करा ‘ह्या’ उपाययोजना..
परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाणी साठा असेल त्यांनी सोयाबीन सोबत एरंडे (Castor) पिकाचे लागवड केल्यास त्यांना आर्थिक फायदा (Economic benefits) जास्त मिळेल. बरेचदा सोयाबीनच्या पिकाला किडी-रोगांमुळे (Insect-borne diseases) सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन हाती लागत नाही, अशावेळी सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून एरंडाची निवड केल्यास उत्पन्नाचा चांगला पर्याय प्राप्त होतो.
वाचा : सोयाबीनवरील खोड माशीचे नियंत्रण कसे करावे?
सोयाबीनची लागवड प्रत्येकी चार फुटांवर होते असते जुलैच्या दरम्यान मधल्या चार फुटी पट्ट्यात प्रत्येकी एक ओळ या पद्धतीने एरंडी लावावे. सोयाबीन काढणी झाल्यानंतर मग पुढे एरंडीचे झाड उंच वाढत राहते. सोयाबीनसाठी मुबलक प्रमाणात मोकळी, हवेशीर जागा मिळते. मशागतीची कामे करणे सोपे होते. कंपनी विकल्या जाणाऱ्या एरंडीला क्विंटलला ८५०० रुपये तर यंदा नऊ हजार रुपये दर मिळाले. बाजार समितीत एरंडी विकल्यास चार हजार ते पाच हजार रुपये दर मिळतो. एरंडी पिकास खर्चदेखील खूप कमी प्रमाणात लागतो. कमी खर्चामध्ये आपण अधिक उत्पन्न मिळू शकतो एकरी सर्वसाधारणपणे एक लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळू शकते.
हे ही वाचा :
1. ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…
2. भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन