पोल्ट्री व्यवसाय (Poultry business) करत असताना हवामानानुसार कोंबड्यांची काळजी घेणे गरजेचे ठरते. विशेषता पावसाळ्यामध्ये व हिवाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापन(Management of hens) करताना काळजी घ्यावी लागते कारण हवेमध्ये मोठ्या प्रमाणात या काळामध्ये गारवा निर्माण होतो व त्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता देखील असते. या सर्व बाबींचा विचार करून कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये ऋतुनुसार बदल करावा लागतो.
हे ही वाचा : अबब! गाईच्या पोटातून निघाले ‘इतके’ किलो प्लास्टिक…
पावसाळ्याच्या काळामध्ये पोल्ट्री चे पत्रे मजबूत आहे की नाही हे पाहावे बरेचदा पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी आत येण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे गार हवामानामुळे कोंबड्या आजारी पडण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे पोल्ट्रीचे पत्रे मजबूत करणे आवश्यक आहे जेणेकरून कोंबड्या वादळ, तसेच थंडगार वारा यापासून त्यांचे रक्षण झाले पाहिजे.
पावसाळ्यामध्ये पोल्ट्री च्या बाजूला अनावश्यक येणारे गवत काढून टाकावे, पावसाचे पाणी रोखण्याकरिता पोल्ट्री च्या बाजूला चारी खोदावी जेणेकरून पोल्ट्री मध्ये पाणी जाणार नाही, पोल्ट्री सतत स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे, थंडगार हवा तसेच पावसाच्या पाण्यापासून रक्षण करण्याकरिता प्लॅस्टिकचे (Of plastic) कागदाचे पडदे पोल्ट्री च्या बाजूस लावणे गरजेचे आहे, परंतु हे पडदे लावताना अशी काळजी घ्या, यदाकदाचित ऊन पडल्यास किंवा ढगाळ वातावरण असल्यास ते पडदे काढणे आवश्यक आहे, त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होईल, पक्ष्यांना देखील त्रास होणार नाही.
हे ही वाचा : या” कारणास्तव सहा खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित वाचा सविस्तर बातमी…
पक्ष्यांच्या खाली ‘तूसाचा’ गादि म्हणून उपयोग करावा, अशी पक्ष्यांची गादि ओली राहणार नाही याकडे काळजी घेणे गरजेचे आहे, ओल्या गादीमुळे रोगजंतूंचा (Pathogens) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, व त्यामुळे पक्ष्यांना अपाय होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही याकरता गादीची आद्रता कमी करण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही चुन्याचा उपयोग करू शकता. तसेच शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव होणार नाही याकडे लक्ष द्यावे. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. ओलसर हवामानामुळे खाद्य खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे खाद्य व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
कोंबड्यांना पिण्याचे पाणी देत असताना, पिण्याच्या पाण्यामध्ये जंतुनाशके (Pesticides) वापरावीत दूषित पाण्यामुळे कोंबड्यांना रोगराई होण्याचा धोका असतो.
कोंबड्यांच्या खाद्य नियोजनाकडे लक्ष देणे पावसाळी वातावरणामध्ये कोंबड्यांचे खाद्य नियोजनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून हिवाळी हवामानामध्ये पक्ष्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल असे खाद्य देणे गरजेचे आहे.
हे ही वाचा :
1)गंधकाच्या कमतरतेची मुळे आढळून येणारी लक्षणे तसेच वाचा गंधकाचे कार्य व महत्व…
2)जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…