पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!
Take care of the animals in the rainy season…!
शेतकरी म्हटले की जनावरेही आलीच..! शेतीची कामे करण्यासाठी, शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय यासाठी जनावरे शेतकरी पाळत असतो.मनुष्य जसा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या शरीराची काळजी घेतो, तसेच जनावरांच्या ही तब्येतीची काळजी घेणे काळाची गरज बनलेली आहे. मान्सूनचे आगमन होत आहे त्यामुळे हवामानात झालेला बदल, पावसामुळे जिवाणूंची संख्याही वाढत असते.त्यामुळे जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. प्रामुख्याने या आजारांमध्ये पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प हे आजार (Diseases of the feet, mouth, ghatsarpa) आढळून येतात.
चला झटपट जाणून घ्या; संपूर्ण ‘कांदा पिक’ लागवड पद्धत फक्त एका क्लिकवर…
आता जनावरांमध्ये होणाऱ्या घटसर्प रोगावरील लसीकरण फक्त एक रुपयात – पशुसंवर्धन विभाग निर्णय…
शेतकरी बांधवांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. जनावरांचे आजार हे लगेच दिसून येत नाहीत. त्यामुळे वेळीच काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते नाहीतर जनावर दगावण्याची शक्यता खूप असते आणि त्यामुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जनावरांमध्ये कोणतेही वेगळे लक्षण दिसले की लगेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला veterinary officer) पाहिजे.
आजारांची लक्षणे (Symptoms of the disease )-
- दुभती जनावरे आटणे किंवा दूध कमी होणे.
- तोंडातून लाळ किंवा फेस येणे.
- भूक मंदावणे किंवा खाने बंद करणे.
- डोळ्यातून सतत पाणी वाहणे.
- जनावर थोडेसे अस्वस्थ किंवा सुस्त होणे.
- सतत हंबरडा फोडणे.
जाणून घ्या खरीप हंगामातील ‘सूर्यफूल’ लागवडीची संपूर्ण माहिती…
पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी…
- जनावरे सकाळी मोकळ्या हवेत किंवा कोरड्या जागेत बांधावित.
- जनावरांच्या गोठ्यात चांगला सूर्यप्रकाश हवा.
- पावसाळ्यापूर्वीच जनावरांना लसीकरण (Vaccination of animals) करून घ्यावे.
- जनावरांच्या गोठ्यामध्ये खड्डा असू नये जेणेकरून खड्ड्यांमध्ये पाणी साठवून त्यामध्ये जीवाणू तयार होतील.
- पावसाळ्यामध्ये जनावरांना स्वच्छ आणि ताजे पाणी पिण्यास द्यावे.
हे ही वाचा:
2.मान्सून पाऊस सुरू झाला आहे ; पावसाळ्यामध्ये ‘जीवितहानी’ टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?