पावसाचा येत्या दोन दिवसांचा अंदाज लक्षात घेऊन पिकांवर फवारणी करा. तसेच शेतातील साचलेल्या पावसाचे पाणी जिरवण्याचा प्रयत्न करा.
पीक विषयी सल्ला:
उडीद – वेळेवर पेरणी केलेल्या उडीद/मुग पिकाची परिपक्व झाल्यास काढणी करून मळणी करून काढलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवा. पिकाची काढणी करताना पावसाचा अंदाज लक्षात घेऊन करा.
कपाशी – जिल्ह्यातील काही भागात कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास
येत आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी निरीक्षणासाठी हेक्टरी २ फेरोमोन सापळे लावावेत.
निंबोळी – अर्काची ५ मिली/ली. पाणी याप्रमाणे फवारणी करावी. बोंड अळीचा प्रादुर्भाव १०% पेक्षा जास्त असल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली पाण्यात मिसळून फवारणी स्वच्छ व कोरड्या हवामानात करा.
वाचा: “स्टीव्हीया” शेतीतून मिळवा 4 ते 5 पटीने अधिक नफा; तुम्हाला माहीत आहे का या शेतीबद्दल?
मका – हवेतील आर्द्रता जास्त असल्यास मका पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या व्यवस्थापनासाठी लेबल क्लेम शिफारसीनुसार योजना करा.
तूर – तूर पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यावर शेंडे खुडावे पिकामध्ये पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीचे कामे उरकून घ्या, जेणेकरून पिकातील तण नियंत्रित होण्यास मदत होईल व पावसाच्या पाण्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन होईल.
सोयाबीन– सोयाबीन पिकावर मारुका या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी फ्ल्यूबेंडामाईड २० डब्ल्यू.जी. @ ६ ग्रॅम पाण्यात मिसळून फवारणी करा. सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी पीक फुलोरावस्थेत असताना २ टक्के युरियाची (२०० ग्रॅम युरिया + १० लिटर पाणी ) पावसाचा अंदाज पाहून फवारणी करा.
भुईमुग- भुईमुग पिकावर काही ठिकाणी हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आला तर नियंत्रणासाठी मेटारायझियम पाच ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात मिसळून आवळणी करा. आद्रता युक्त वातावरणासाठी टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३% डब्ल्यू पी १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
वाचा: २०२१ चा खरीप पीक “हमीभाव” जाहीर! सर्वांत अधिक कोणत्या पिकाला मिळाला भाव? पहा सर्व पिकांचे हमीभाव…
पुढचे 5 दिवस “या” फळे-भाजीपाल्यांची घ्या अशी काळजी; अन्यथा नुकसानास बळी पडाल
फळे आणि भाजीपाला पिक विषयी सल्ला वाचा सविस्तर..
वांगी –
फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी स्पिनोसॅड या कीटकनाशकाची ३.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन करा.
मिरची –
मिरचीतील भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा डिनोकॅप ५ मिली किंवा टील्ट १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन करावी. आवश्यकतेनुसार नंतरच्या फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने करा.
संत्रा –
संत्रा फळबागेतील आंबिया बहारात होणारी फळगळ कमी करण्यासाठी १.५ ग्रॅम जिब्रेलिक अॅसिड आणि १०० ग्रॅम कार्बनडेन्झीम ५० डब्ल्यू.पी. यांचे १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून फवारणी स्वच्छ व कोरड्या हवामानात फवारणी करा. आवश्यकता असल्यास १५ दिवसांनी परत दुसरी फवारणी करा.
वाचा: जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्रात कुठे मिळतोय उडीद ला जास्त भाव; काय आहे दर पहा सविस्तर..
भेंडी – ढगाळ हवामानामुळे भेंडी पिकावर फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भ होण्याची शक्यता आहे . प्रादुर्भ झाल्यास नियंत्रणासाठी पिकावर डेल्टामेथ्रीन २.८ % इ.सी. ८ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
टोमॅटो – टोमॅटो पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नोवाल्युरॉन १० % ई.सी, १५ मिली किंवा क्लोरॅट्रॅ निलीप्रोल १८.५% एस.सी ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
केळी – सध्याच्या ढगाळ उष्ण व दमट हवामानामुळे केळीवर करपा ( सिगाटोका) रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पानाचा भाग/पाने काढून जाळावीत रोगाची लक्षणे दिसताच प्रोपिकोन्याझोल ५ मिली. व मिनरल ऑइल १०० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी त्यानंतर २० दिवसाच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.
डाळिंब- फळधारण बागेत फक्त फळ वाढीच्या अवस्थेत तेलकट डाग व्यवस्थापनासाठी कॉपर हायड्रोक्साइड ५३.८ %२० ग्रम + स्ट्रेप्टोसायक्लीन १०० % ५ गरम + ब्रोनोपोल ९५ – ९८ % ५ गरम + स्प्रेडर स्टीकर ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.
द्राक्ष – ढगाळ हवामान व कमी तापमान यामुळे मिलीबगचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मिलीबग नियंत्रणासाठी ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशकाचा वापर टाळावा. प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी ब्युप्रोफेझीन २५ एस.सी. @ १.२५ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा:
- असंघटित कामगारांसाठी सरकार सुरू करणार “हे” नवीन पोर्टल; जाणून घ्या कसा जाईल फायदा..
- बंपर ऑफर, प्लास्टिक मल्चिंग योजनेचा लाभ घ्या व मिळवा 16 ते 18 हजारापर्यंत अनुदान; पहा कसे..