योजना

बंपर ऑफर, प्लास्टिक मल्चिंग योजनेचा लाभ घ्या व मिळवा 16 ते 18 हजारापर्यंत अनुदान; पहा कसे..

Take advantage of bumper offer, plastic mulching scheme and get grants from 16 to 18 thousand; See how

मल्चिंग म्हणजेच वनस्पतीच्या ( Plants ) मुळाभोवतीची जमीन झाकली जाते म्हणून झाडाजवळील जमिनीत हवा तेवढा ओलावा टिकून राहतो, तण उगवत नाही व प्लांट प्लेटचे तापमान सामान्य राहते. मल्चिंग ( Mulching ) दोन्ही नैसर्गिक ( Natural) आणि प्लास्टिक ( plastic ) फिल्म प्रकार असू शकतात. ही योजना आहे प्लास्टिक मल्चिंगची . ज्यामध्ये आपण उत्पादन 10 ते 80 टक्के जास्त काढू शकतो. आपण पाहतो की फळझाडांना, पालेभाज्या पिकाच्या सभोवताली पेपर तयार केलेले असतात त्याला प्लास्टिक फिल्म ( Plastic film ) म्हणतात. प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो.

रा.फ.अ अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान –

अनुदान किती, आवश्यक पात्रता, प्लास्टिक मल्चिंग पेपर चे लाभ कोणते, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कोठे करावा, याविषयी सर्व माहिती आपण जाणून घेऊया…

अनुदान –

प्रति हेक्‍टर रुपये ३२,००० असून या खर्चाच्या ५०टक्के म्हणजेच जास्तीत जास्त १६,००० रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे अनुदान देणार आहेत. डोंगराळ भागात प्रति हेक्‍टर हे ३६,८००/- रुपये मापदंड असेल. या खर्चाच्या ५०टक्के म्हणजेच जास्तीत जास्त १८,४००/- रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे दोन हेक्‍टर क्षेत्र देय देणार आहेत.

PM किसान ट्रॅक्टर योजना : ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे तर मिळेल 50 टक्के पर्यंत सबसिडी! वाचा कसा फायदा मिळेल तुम्हाला…

असा करा ‘ड्रॅगन फ्रुट लागवड’ अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज…

वेगवेगळ्या पिकांसाठी मल्चिंग फिल्म कोणती असते?

  • मल्चिंग फिल्म चा अभ्यास करून शेती केली तर अधिक उत्पन्न काढाल.
  • जी पिके ११-१२ महिने कालावधी ची असतात. पपई वगैरे यांसारख्या फळपिकांना – ५० मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
  • ३-४ महिन्याच्या कालावधीत येणारे भाजीपाला, स्ट्रॉबेरी पिकासाठी – २५ मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म वापरली जाते.
  • १२ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेणाऱ्या सर्व पिकांसाठी – १०० किंवा २०० मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरली जाते

पिकाच्या कालावधीनुसार मल्चिंग फिल्म ( Mulching film ) वापरली जाते. या प्रोसेस लक्ष देऊन केल्या तर चांगले उत्पन्न घेऊ शकतो.

पात्रता लोक – शेतकरी , बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.

कागदपत्रे – आधार कार्डची छायाप्रत , आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, ७/१२ उतारा , ८-अ प्रमाणपत्र आवश्यक

अर्जासाठी- कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करावा. या योजनेची अधिक माहिती मिळवा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button