कृषी बातम्या

शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कमाई वाढवण्यासाठी आली नवीन प्रकारची शेती पहा, काय नवीन आहे या शेतीमध्ये वाचा सविस्तर बातमी…

Take a look at the new types of farming that have come to increase the income and earnings of farmers, read detailed news in this new farming


🌱आज-काल पारंपरिक शेती करताना (Traditional agriculture) त्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा भर आहे, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे, दिवसेंदिवस लोकसंख्या ही वाढ होणार आहे.

🌱या लोकसंख्यावाढीला सर्वात आवश्यक असणारा घटक म्हणजे कृषी उत्पन्नात वाढ शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कमाई वाढवण्यासाठी नवीन प्रकारची शेती विकसित झाली आहे ,या शेतीला या शेतीला “प्रिसिजन फार्मिंग” असे म्हणतात. ही प्रिसिजन फार्मिंग शेतकऱ्यांची (Farmers)आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

🌱 या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा(New technology) अवलंब केला जातो, या शेतीमध्ये माती पासून,बियाणे पर्यंत,खतापासून कीटकनाशक का पर्यंत अचूक वापर केला जातो. यामध्ये तंत्रज्ञान असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती बाबत योग्य निर्णय घेतला जातो.

🌱शेतीमध्ये वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे देखील ह्या शेतीमुळे टाळता येऊ शकते, तसेच पर्यावरणाचे रक्षण देखिल या शेतीने होणार आहे, यांत्रिक उपकरणाच्या साहाय्याने म्हणजे सेन्सर च्या साह्याने मातीचे परीक्षण करून गवत,रोग वनस्पती, तसेच पिकावर होणारे आजार तसेच त्यांच्यावर केले जाणारे उपचार जसं येणे शोधता येऊ शकते,

🌱या सर्वांचे वेळेवर परीक्षण देखील होऊ शकते. हे तंत्रज्ञान अमेरिकेत सुरू झाले आहे, तसेच नेदरलँडमध्ये बटाट्याची शेती या तंत्रज्ञानाने केली जात आहे, या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीचा खर्च कमी होतो तसेच नफा वाढन्यास होण्यास मदत होते.

प्रिसिजन फार्मिंगचे फायदे

✍️ या फार्मिंग मुळे कृषी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.

✍️पर्यावरणाला हानी पोहोचत नाही तसेच मातीचे आरोग्य ही बिघडत नाही.

✍️अचूक रसायने सांगितल्यामुळे पिकांना जास्त रसायन देण्याची गरज भासत नाही.

✍️पाण्याचे व्यवस्थापन अचूक करता येते.

✍️ पिकाची गुणवत्ता आणि उत्पन्न वाढविण्यास देखील मदत होते.

✍️या शेती तंत्रज्ञानामुळे लागणारा वेळ व खर्च यांच्यात बचत होते.

✍️शेतीमुळे शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

या शेतीतील त्रुटी

भारतात या शेतीबद्दल स्थानिक तज्ज्ञ, निधी, या पद्धतीची पूर्ण माहिती इत्यादींचा अभाव आहे. यासाठी प्रिसिजन फार्मिंगचा प्रारंभिक खर्च देखील खूप जास्त असतो.

👩‍💻 हे ही वाचा:

1) वृक्षलागवड करण्याकरता मिळणार शंभर टक्के अनुदान कोणती आहे ही योजना
2) ही शेळी देणार दिवसाला बारा लिटर दूध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button