कृषी सल्ला

गंधकाच्या कमतरतेची मुळे आढळून येणारी लक्षणे तसेच वाचा गंधकाचे कार्य व महत्व…

Symptoms of sulfur deficiency as well as its function and importance.

गंधक ( Sulfur) पिकांच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्यक अन्नद्रव्य आहे. पूर्वी शास्त्रज्ञ गंधकाला दुय्यम अन्नद्रव्य संबोधित होते. अथापि त्याची आवश्यकता वाढल्यामुळे त्याचा मुख्य अन्नद्रव्यामध्ये समावेश करण्याची वेळ आली आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ल तयार करण्यासाठी गंधक आवश्यक घटक आहे.

जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा(Sulfur)सहभाग महत्वाचा असून वनस्पती श्वसनक्रिया, तेल निर्मीती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्वपूर्ण भूमिका करते.

जमिनीमधून पिके विशेष जास्त उत्पादन देणारे संकरित वाण दर हंगामात गंधकाचे मोठया प्रमाणावर शोषण करतात. परंतु जमिनीमध्ये गंधकयुक्त खते त्याप्रमाणात टाकली जात नाहीत. नत्रयुक्त खतामध्ये अमोनियम सल्फेट ऐवजी युरियाचा वापर वाढतो आहे. जवळजवळ स्फुरद इतकेच गंधक(Sulfur)बहुतेक पिके जमिनीतून मुळाद्वारे घेतात.

विशेषतः तेलबिया पिकाची गंधकयुक्त खताची गरज जास्त असते. मात्र त्याची जमिनीत भरपाई त्याप्रमाणात केली जात नाही.

गंधकाचे महत्व(Sulfur)


✍️गंधकाच्या वापरामुळे उत्पादन आणि लाभाशांत वाढ होते.

✍️गंधकाच्या वापरामुळे कृषिमालाच्या उत्पादकतेत व गुणवतेत वाढ होते.

✍️गंधकामुळे जमिनीचे आरोग्य आणि चिरस्थायी उत्पादकता टिकविता येते.

✍️गंधकामुळे नत्राची कार्यक्षमता व उपलब्धता वाढते.
गंधकाला ‘भुसुधारक’ असे म्हणतात. कारण गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्वाचा ठरतो.

✍️अतिशय महत्वाचे म्हणजे गळितधान्यामध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी गंधकाचा उपयोग होतो.
गंधकामुळे पर्यावरण संवर्धन होते.

इतर अन्नद्रव्यासोबत सकारात्मक फायदा होतो.

गंधकाचे कार्ये(Sulfur)


🌱गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मीतीला चांगली चालना मिळते.
वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जिवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ यामध्ये आढळते.

🧅हे तेलयुक्त पदार्थ वनस्पतींना तिखट वास प्रदान करते. उदा. कांदा, लसूण
गंधक हे अमायनोअॅसिड तयार करण्यास मदत करते व तो त्याचा घटक आहे. उदा. सिस्टीन व सिस्टाईन म्हणजेच प्रथिने तयार होण्यास गंधक आवश्यक आहे.
गंधक हा मिथीओनाईन, थायमीन आणि बायोटीन यांचा महत्वपूर्ण घटक आहे.

🌱गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. जर गंधक कमी पडल्यास १८ टक्क्यांपर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते.

🌱गंधक द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ होण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिर करण्यास मदत करते.

🌱वनस्पतींच्या निरनिराळया विकरांच्या व चयापचयाच्या क्रियेत मदत करते.

🍇फळे तयार होण्यास गंधकाची अत्यंत आवश्यकता असते.

गंधकाच्या(Sulfur) कमतरतेमुळे पिकांमध्ये आढळून येणारी लक्षणे.


🌱गंधकाचा अभाव झाल्यास पाने पिवळी पडतात.
फळे पिवळसर हिरवी दिसतात, त्याची वाढ कमी होते, रंग बदलतो व आतील गर कमी होतो.

🌱नवीन येणारी पाने आणि पालवी पिवळी पडू लागते, देठ किरकोळ व आखुड राहतात. कोवळया पानांवर जास्त परिणाम दिसतो.

🌱द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरिकरणाच्या गाठीचे प्रमाण कमी होते.

🌱पानगळ लवकर होते, पानांच्या कडा व शेंडे आतल्या बाजूस सुरळी होऊन गळतात.

👩‍💻 हे ही वाचा

१) ही शेळी देणार दिवसाला १२ लिटर दूध
२) जनावरांना ह्या एका कारणामुळे होऊ शकते विषबाधा, व जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून घ्या अशी काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button