आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..
Surprise! What is the difference between the smallest cow in the world and two feet in length in India?
नुकतेच केरळमधील एका गाईचा समावेश ‘गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये’ झाला आहे. असा काय वेगळेपण आहे या छोट्या गाई मध्ये तर तिची उंची आणि लांबी. लांबीच्या दृष्टीने अतिशय लहान आहे, केरळ मधील अंतुली गावातील बाळकृष्ण यांच्याकडे ही गाय आहे.
या गाईची वयोमर्यादा सहा वर्ष आहे ,तिची लांबी 61 सेंटीमीटर आहे. केरळ मधील शेतकरी एन व्ही बालकृष्णन या गाईचे पालन करतात, पाच वर्षापूर्वी त्यांनी ही गाय त्यांच्या घरी आणली होती तेव्हापासून घरातील सदस्याप्रमाणे ती त्याचे पालन करतात.
पशुसंवर्धन डॉक्टर नायर यांनी अशा प्रकारची कधी पूर्वी अशी गाई पाहिली नसल्याचे सांगितले आहे. ही गाय असामान्य स्वरूपाची असल्याचे म्हटले गेले आहे,सध्या ही गाई खूप प्रसिद्ध झाली आहे तसेच गाई सोबत फोटो काढण्यासाठी लोक गर्दी देखील करतात. या गाईचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गाईचे दूध हे उच्च प्रतीचे आहे.
ही गाय केरळमधील वेचुर मध्ये आढळली होती. त्यामुळे ही गाई वेचुर् प्रजातीचे असल्याचे बोलले जात आहे.