ताज्या बातम्या

सुपरफास्ट टॉप टेन : राज्यातील टॉप टेन घडामोडी फक्त एका क्लिकवर..

Superfast Top Ten: Top Ten events in the state with just one click.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणि उद्या राज्यभर आंदोलन पुकारल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन 2017-18 अंतर्गत अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक या ग्रामपंचायतीस प्रथम, लोणी बु. ता. राहता, जि. अहमदनगर या ग्रामपंचायतीस द्वितीय तर कुशेवाडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग या ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

[metaslider id=4085 cssclass=””]

राज्यात हत्तीरोग (Filariasis) निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा 15 जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे. यासाठी 6 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात आज (1 जुलै) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाली.

खरिप हंगामातील पिकांसाठी विशेष करुन धान (Paddy), मका, बाजरी, कापूस यासह इतर पिकांचा विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे.

तेल विपणन कंपन्यांनी देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. आता आपल्याला घरगुती सिलेंडरवर आजपासून 25.50 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह होणा-या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. पण, येत्या आ़ठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागानं वर्तवलीआहे. राज्यात 8 ते 9 जुलै नंतर परत पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरु केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेच्या विस्तारासाठी 28 जून रोजी आर्थिक पॅकेजची घोषणा केली.

राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग , सुधागड, तोरणा किल्ला या सहा किल्ल्यांचे सर्वांगिण संवर्धन करण्यात येणार आहे.

हेही वाचा :


आजचा कृषी सल्ला:-

सात बाऱ्यात ५० वर्षानंतर करण्यात येणार ‘हा’ बदल! तसेच ऑनलाइन फेरफार कसा कराल? जाणून घ्या

खबरदार! जुनी झाडे तोडल्यास होणार लाखो रुपयांचा दंड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button