ताज्या बातम्या

सुपरफास्ट बुलेटीन: ऐका दुपारच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Superfast Bulletin: Listen to the afternoon news with just one click

१) राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्त्वाचा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

२) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गटांगळ्या खात असलेली अर्थव्यवस्था आणि धास्तावलेल्या सामान्य लोकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून (RBI) बुधवारी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली यावेळी RBI ने बँकांसाठी कोविड लोन बुक ही योजना जाहीर केली

हेही वाचा. –“या” सरकारी योजनेतून मिळणार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, करा असा अर्ज!

३) नाशिक : कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक जणांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागत आहे. मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींना विशेषतः म्युकरमाक्रोसिस (Mucormycosis) या आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या काळात करा या फळाचे सेवन होईल प्रतिकार शक्ती वाढवण्यास फायदेशीर…

४) कोरोनामुळे दहावी परीक्षा रद्द झाली मग बारावी परीक्षेचं काय? दहावी प्रमाणे बारावी परीक्षांबाबत सारखाच निर्णय का नाही? विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस बारावीचा अभ्यास करायचा? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून केले जात आहेत.

हेही वाचा: सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी घ्या काळजी.

५) देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी महागलं आहे.

हेही वाचा: राज्यातील नागरिकांसाठी ही आहे सर्वात आनंदाची बातमी..

६) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात जवळपास 581 Pressure Swing Adsorption (PSA) मेडिकल ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा: आता देवगड हापूस आंबा ओळखणे झाले सोपे पहा कसा ओळखाल देवगडचा आंबा?

७) मोहफुलांवर सद्यस्थितीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 या कायद्याअंतर्गत असलेले निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे.निर्बंध हटवल्यानं त्यावरील प्रक्रिया उद्योग आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

हेही वाचा:
१) वांग्याला मिळतोय मातीमोल भाव ! तर नगर मध्ये चिंच राज्यात अव्वल पहा शेतमालाचा बाजार भाव फक्त एका क्लिकवर…
२) वेडीवाकडी असणारे आले अंत:रंगाने किती आहेत बहुगुणी? वाचा’ हे ‘आल्याचे’ गुणधर्म:
३)अशी करा शेततळ्यामध्ये “मत्स्य शेती” व अशी घ्या “मत्स्यशेती” ची काळजी…

४)वृक्ष ‘ लागवड करण्यासाठी मिळणार शंभर टक्के अनुदान! पहा : कोणती आहे ही योजना व कसा कराल अर्ज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button