इतर
सुपर बुलेटिन : दिवसभर (08/07/2021) घडामोडींचा थोडक्यात आढावा..
Super Bulletin: A brief overview of the day (08/07/2021).
- नंदुरबार जिल्ह्यातील गेल्या खरीप हंगामात विमा घेणाऱ्या दहा हजार शेतकऱ्यांना भरपाई विनाच राहावं लागलं असल्याचे समोर आलं आहे. 2020 च्या खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे पिकाची कापणी करताना समोर आलं होतं. जिल्ह्यात केवळ 1,037 शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळाला आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीच्या किमतींच्या (Gold Silver Price Today) वाढीचा परिणामही आज स्थानिक बाजारात अर्थात गुरुवारी व्यापार सत्रात दिसून आला. स्थानिक वायदा बाजारामध्ये गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56 रुपयांनी वाढून 47,966 रुपयांवर पोहोचले
- आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणार्या मानसेवी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तब्बल 281 डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी या डॉक्टरांनी दिलीय.
हे ही वाचा : पंतप्रधान पीक विमा योजनामध्ये कोणत्या पिकास किती रुपयेचा हप्ता आहे? तसेच नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत
- होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) पुन्हा एकदा आपल्या स्कूटर्सच्या किंमती वाढवल्या आहेत, कंपनीने अॅक्टिव्हा रेंजच्या किंमती 1237 रुपयांनी वाढवल्या आहेत.
- शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे बँकांना कळवण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांना बँकांमध्ये पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे लेखी द्यावं लागणार आहे.
हे ही वाचा : गाईच्या शेणापासून तयार होणार रंग! या प्रकल्पासाठी नितीन गडकरी असणार ब्रँडॲम्बेसिडर वाचा सविस्तर बातमी…
- केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम असणारं मोबाइल अॅप “मत्स्य सेतू” सुरु केले आहे.
- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे ही वाचा :
2. दुधाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ, तर सोयाबीन, सूर्यफूल तेलामध्ये घसरण…
3. पाकिस्तानी स्वस्त कांदा बाजारपेठे, भारतीय कांदा उत्पादक अडचणीत येणार का?