रब्बीत ज्वारी सोबत चाऱ्यासाठी कडबा ही महत्त्वाचा मानला जातो. यंदा मात्र कडव्याचे चांगले उत्पन्न निघाले आहे. मात्र बाजारात ज्वारी पेक्षा काढब्याला अधिक दर आहे. सध्या ग्रामीण भागात कडब्याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सध्या बाजारात नगरमध्ये ज्वारीला 1800 ते 3300 रुपये क्विंटल दर मिळत आहे. तर काढब्याला प्रति टन 4000 ते 5500 रुपयापर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे बाजारात ज्वारी पेक्षा कडबा भाव खात असल्याचे दिसून येत आहे.
शेत मालाची काय आहे उन्हाळ्यात परिस्थिती चला जाणून घेऊ…
वाढत्या उन्हामुळे रसदार फळांच्या मागणीत झाली वाढ.काकडी,लिंबे आणि कलिंगडाची आवक वाढली. पहा फळभाज्यांचा भाव किती आहे (pune) वाचा सविस्तरपणे….
गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची खूप आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक मागणी आणि दर स्थिर होते मात्र उन्हाळ्यामुळे काकडीची आणि लिंबाची मागणी वाढल्याने आणि तुलनेने आवक घटल्यामुळे मटार हिरवी मिरची आणि गवारीच्या मध्ये वाढ झाली. मात्र इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. तसेच कलिंगड खरबुजाचे आवक आणि मागणीत वाढ झाल्याने त्याच्या दरात ही वाढ झाली. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये लिंबाचे मागणी वाढल्याने त्याच्या दरातही वाढ झाली.
परराज्यातून आलेल्या आवकेमध्ये गुजरात कर्नाटक राजस्थान,आंध्र प्रदेश,तमिलनाडु सह मध्य प्रदेश इत्यादी राज्यांचा समावेश होता.
पाहुयात फळभाज्यांचे दहा किलोचे भाव:
👉 कांदा- 120 ते 170 ; बटाटा- 70 ते 130 ; लसुन – 400 ते 600 ; भेंडी 250 ते 300, गवार 400 ते 600 टोमॅटो 50 ते 100 हिरवी मिरची 320 ते 500 मटार – 300 ते 400, गाजर 100 ते 140, शेवगा 200 ते 300, काकडी 150 ते 250
पालेभाजी:
👉 (शेकडा जोडी)
कोथिंबीर 300 ते 800, मेथी 300 ते 500
, शेपू 500 ते 800, कांदा पात 500 ते 800
हेही वाचा :-
शेतकरी मित्रानो, योजने चा लाभ मिळत नाही. तर करा इथे तक्रार वाचा सविस्तर
https://mieshetkari.com/farmer-friends-do-you-have-any-problems-so-complain-here-take-a-look