आता ऊसतोड कामगारांची सुद्धा नोंदणी (Registration) करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांची नोंदणी करावी असा आदेश धनंजय मुंडे यांनी 22 सप्टेंबर 2021 रोजी दिला आहे. या आदेशानुसार ग्रामसेवकांमार्फत नोंदणी केली जाणार आहे. नोंदणीनंतर ओळखपत्र (ID card) दिले जाणार आहे.
वाचा –
कष्टकरी हातांचे ऋण फेडणार –
कामगारांनी सातत्याने स्वतःची व त्यांच्या मुला-बाळांची उपेक्षा सहन केली आहे. या कष्टकरी हातांच्या ऋणातून उतराई होण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने (State Government) हा निर्णय घेतला आहे.
कामगार कल्याण मंडळाच्या (Workers Welfare Board) माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची नोंदणी केली जाणार आहे. यामुळे आतापर्यंत कुठल्याही दस्तावेजात ‘ऊसतोड कामगार’ (Sugarcane workers) अशी नोंदणी नसलेल्या लाखो असंघटित ऊसतोड कामगारांची आता अधिकृत नोंदणीचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे.
वाचा –
नोंदणीची मुदत –
ही नोंदणी (Registration) उसाचा यावर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच करा, नोंदणी करताना स्थानिक राजकारण, गाव स्तरावरील गटबाजी किंवा पक्षपात अशा कोणत्याही बाबीचा परिणाम नोंदणीवर होऊ देऊ नका आणि पारदर्शक पद्धतीने ऊसतोडणी कामगारांची सरसकट नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे.
या ओळखपत्रासाठी कागदपत्रे –
1) आधार कार्ड, फोटो
2) बॅक खाते आणि शिधापत्रिका इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.
योजनेचे लाभार्थी –
ज्या ऊसतोड कामगारांनी सध्या ऊसतोडणीचे काम बंद केले आहे.पण पूर्वी ऊसतोडणी करत होते, अशा कामगारांचीही नोंदणी केली जाणार आहे. या महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, आरोग्य विमा यासारख्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा