Sugarcane Varieties | ऊस संशोधन केंद्रामध्ये (Sugarcane Research Center) , दहा एकरामध्ये उसाच्या आठ जातींची संशोधनासाठी लागवड (Sugarcane Cultivation) करण्यात आली आहे. त्यातून पहिल्या वर्षीचे निष्कर्ष (Lifestyle) हाती आले आहेत. या ‘ कोएम- ०२६५ ‘ आणि ‘ को- ९२००५ ‘ अशा जाती आहेत . या ऊसपहिल्या निष्कर्षात सरस ठरल्या आहेत.
पोषक ऊस जातींची गरज –
शेतकऱ्यासाठी जाती खूप महत्त्वाचा ठरतात . उत्पन्नात वाढ कशी करता येईल याचा सर्वत्र विचार करत आहेत. कोकणातील ऊस लागवडीचा मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकरी केवळ १५ ते १६ टन उत्पादन मिळत आहे. कोकणातील वातावरण कोणत्या ऊस जातींना पोषक आहे, याचा अभ्यास होण्याची गरज होती.त्यादृष्टीने नापणे येथील ऊस संशोधन केंद्रामध्ये २०२० पासून प्रकल्पाधिकारी डॉ. विजय शेट्ये यांचा (Lifestyle) गट ऊस जातींवर संशोधन करीत आहे. २०२० मध्ये संशोधन केंद्रामध्ये पहिल्या वर्षी विविध आठ जातींची दहा एकरांत लागवड करण्यात आली.
वाचा: Sugarcane Farming | शेतकऱ्यांनो ‘या’ ऋतूत घ्या ऊसाचे पीक! मिळेल 25% अधिक गोडवा अन् उत्पादन, पेरणीपूर्वी घ्या विशेष काळजी
तर पहिल्याच वर्षी पराक्रम –
तीन वर्षांच्या निष्कर्षांनंतर उत्पादनाचा अंतिम आकडा काढता येणार असला तरी पहिल्या वर्षाच्या निष्कर्षात कोएम ०२६५ या जातीपासून हेक्टरी ८०.४६ टन आणि को ९२००५ या जातीपासून हेक्टरी ८०.४५ टन उत्पादन मिळाले आहे. या दोन जातीच्या तुलनेत इतर सहा जातींपासून खुपच कमी उत्पादन मिळाले. त्यामुळे पहिल्या निष्कर्षानुसार कोकणातील वातावरण या जातीसाठी पोषक मानले जात आहे. संशोधन केंद्राद्वारे पुढील दोन वर्षे (Lifestyle) उत्पादन वाढीसंदर्भात अभ्यास केला जाणार आहे.
- कोएम-०२६५ पासून हेक्टरी ८०.४६ टन उत्पादन
- को- ९२००५ पासून हेक्टरी ८०.४५ टन उत्पादन
- इतर सहा जातींपासून खूपच कमी उत्पादन
- आणखी दोन वर्षे होणार संशोधन
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: