ऊस आंतरमशागत व खत पेरणी यंत्र; मनुष्यबळाचा वापर कमी, शेतकऱ्यांना ठरेल सोयीस्कर..
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारे पारंपरिक यंत्राविषयी आपण माहिती घेणार आहोत. “बैलचलीत यंत्र” ऊस पिकातील तण काढणे, रासायनिक दाणेदार खताच्या मात्रा देणे, उसाची बाळ बांधणे व मोठी बांधणी इत्यादी बहुविध आंतरमशागत कामे या एकाच बैलचलीत यंत्राद्वारे गरजेनुसार थोडासा बदल करून करता येतात. हे यंत्र एका बैल जोडीच्या साहाय्याने चालवीता येते. दोन फणातील अंतर कमी जास्त करण्याची व जमिनीत खत देण्याची खोलीसुद्धा कमी जास्त करण्याची सोय आहे.
वाचा –
ऐका दिवसात 1.5 ते 2 हेक्टर खताच्या पेरणी टोकदार फणाने केली जाते –
विशिष्ट प्रकारच्या रचनेमुळे प्रति हेक्टरी 700 किलो खताची मात्रा देता येते. शिवाय उसाचे ओळीपासून 15 ते 20 सेंमी अंतरावर तसेच जमिनीत 7 ते 8 सेंमी खोलीवर खत पेरता येते. एका दिवसात 1.5 ते 2 हेक्टर क्षेत्रात खताची पेरणीत विशिष्ट पध्दतीच्या टोकदार फणाने केली जाते. खताची मात्रा देतानाच बाळ बांधणीचे काम देखील होते.
वाचा –
दिवसात 15 ते 20 सेंमी खोलीपर्यंत एक ते दीड एकर क्षेत्रावर 30 सेंमी उंचीवर मातीची भर पिकाला देऊन मोठ्या बांधणीचे काम देखील पूर्ण होते. पारंपरिक पद्धतीने वरील कामे करण्यासाठी लागणाऱ्या अधिक मनुष्यबळाचा वापर कमी होतो व खर्चात देखील काटकसर करण्यासाठी या यंत्राचा वापर निश्चित झाला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा