ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

ऊस उत्पादकांनो, आधुनिक गुऱ्हाळाचा उपयोग करून बनवा सेंद्रिय गुळ आणि व्हा मालामाल…

Sugarcane growers, make organic jaggery and become a commodity using modern livestock

आलिकडच्या काळामध्ये शेतीपूरक व्यवसाय (Agricultural business) बरेच शेतकरी करत असतात, शेतीबरोबरच शेती संलग्न व्यवसाय किंवा प्रक्रिया व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांना ( farmers) अधिक फायदेशीर ठरते, याचाच एक भाग म्हणून ऊस उत्पादकांसाठी आधुनिक गुऱ्हाळा (Modern barn) चा उपयोग करून सेंद्रिय गुळ (Organic jaggery) कसा बनवायचा याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत,

महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची शेती केली जाते तो बरेच शेतकरी पारंपारिक पद्धतीने गुळ निर्मिती (Jaggery production in the traditional way) करतात, अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, खूप सारे लोक गुळाचा चहा (Jaggery tea) पिण्याचे देखील पसंत करतात त्यामुळे सेंद्रिय गुळास बाजारात मोठी मागणी आहे. परंतु पारंपरिक पद्धतीने गुळ निर्मिती केल्यास जागेची व्यवस्थापना मोठ्या प्रमाणात लागते तितकेच मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागते, परंतु आधुनिक पद्धतीने सेंद्रिय गुळ केल्यास मनुष्यबळ कमी प्रमाणात (Less manpower) लागते त्याचप्रमाणे जागा देखील कमी लागते.

गूळ प्रक्रिया निर्मिती : (Jaggery process formation)

पारंपारिक गुळ प्रक्रिया निर्मितीमध्ये चिपाड वाळण्यासाठी खूप वेळ लागत असे मात्र यंत्राच्या साह्याने चिपाड वाळवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो यामध्ये ४० फूट लांबीचा लोखंडी टायर बसवलेला असतो तो लोखंडी टायर चुलीतील उष्णता खेचून घेतो आणि कमीत कमी २० ते ३० मिनिटांमध्ये ते चिपाड वाळवितो. क्रशर ते ड्रायरच्या (From crusher to dryer) मदतीने चिपाड व रस वेगळे होतात, मोटरच्या साह्याने रस कढाई मध्ये टाकला जातो व त्यापासून गूळ निर्मिती केली जाते

आधुनिक गुऱ्हाळाचे फायदे :

  • आधुनिक पद्धती मध्ये मनुष्यबळ कमी लागते व सर्व गूळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया पटापट होतात, त्यामुळे वेळेची बचत होते.
  • जुन्या गोळा करता कमीत कमी एक एकर जागा वापरली जाते परंतु आधुनिक गुऱ्हाळाला सर्व यंत्रासाठी चार ते पाच गुंठे जागा लागते.
  • जुन्या पद्धतीमुळे वाळलेले चिपड पुन्हा वापरता येत नाही परंतु आधुनिक यंत्राच्या साह्याने वाळवलेले चीपड पुन्हा वापरात येऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button