ताज्या बातम्या

Sugar Rate | आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची दरवाढ कायम! सातत्याने तब्बल ५० हजार रुपयांवर दर; जाणून घ्या सविस्तर

The price of sugar continues to rise in the international market! Consistently priced at around Rs 50,000; Know in detail

Sugar Rate | आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमतीत वाढ कायम आहे. येणाऱ्या हंगामात जगातच साखर उत्पादन कमी राहील, असा अंदाज सर्वत्र वर्तवला जात असल्याने बाजारात साखरेच्या किमतीत वाढ सुरूच असल्याचे चित्र आहे. सध्या आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या व पांढऱ्या साखरेला प्रति टन ५२००० रुपयांवर दर आहेत. तर रिफाईंड साखरेचे दर ६०००० रुपये टनाच्या आसपास आहेत.

साखर उत्पादन
एलनिनोच्या प्रभावामुळे अनेक साखर उत्पादक देशांमध्ये यंदा पावसाची परिस्थिती फारशी चांगली नाही. याचा फटका संबधित देशांना बसण्याची शक्यता आहे. ब्राझीलपाठोपाठ साखर उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या भारतामध्येही येत्या हंगामात साखर उत्पादन घटीची शक्यता आहे. यामुळे भारतासह अन्य साखर उत्पादक देशांना पहिल्यांदा स्थानिक गरज भागवण्यावर प्राधान्य द्यावे लागणार आहे. यामुळे हे देश निर्यातीला कितपत प्राधान्य देतील याबाबत जागतिक पातळीवर संभ्रमावस्थे आहे.

वाचा : Sugar Export Ban | मोठी बातमी! भारत सात वर्षांत प्रथमच साखर निर्यातीवर घालणार बंदी; जाणून घ्या कारण आणि दरावर होणार का परिणाम?

साखरेचे दर
या पार्श्वभूमीवर येणाऱ्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी होणार याबाबतचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. याचा सगळा परिणाम साखरेच्या किमती वाढण्यावर होत आहे. भविष्यातही हीच स्थिती कायम रहाण्याची शक्यता आहे. भारताला मात्र या वाढत्या किमतींचा फायदा होणार नाही. केंद्राने सप्टेंबर मध्यापर्यंतच सुमारे ६० लाख टन साखर निर्यातीची मुदत दिली. दर चांगले असल्याने अनेक कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिले. यामुळे जलदगतीने साखर निर्यात झाली.

त्यानंतर मात्र निर्यातीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली. सध्या तरी हंगाम सुरू झाल्याशिवाय निर्यातीला परवानगी देण्याचा विचारही केंद्र सरकार करत नसल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. पहिल्यांदा स्थानिक गरज पाहूनच निर्यातीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सार्वजनिक अन्न व वितरण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The price of sugar continues to rise in the international market! Consistently priced at around Rs 50,000; Know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button