साताऱ्याच्या पाचगणीमध्ये शेतकरी सफरचंदची शेती (Apple farming) पिकवू लागले आहेत. पाचगणी भागातील राजपुरी, खिंगर,अमरळ, गोडवली या गावांत सफरचंदांची ६०० झाडे लावण्यात आली असून त्याला गोड चांगली फळे देखील आली आहेत. इथे राहणारे शेतकरी नारायण दुधाने, संजय दुधाने आणि सलीम अलजी यांनी सफरचंदाच्या शेतीची लागवड (Cultivation of apple farming) करायला केली. त्यांना सफरचंद शेतीतून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
3 वर्षाच्या मेहनतीनंतर झाडाला आली फळे –
या शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची ६०० झाडं पाचगणी भागात आणली होती.
यानंतर ही झाडे मोठी करायला त्यांनी पूर्ण कष्ट घेतले. झाडांची काळजी घेत झाडे मोठी केली. आणि या कष्टाचं फळ त्यांना मिळाले. 3 वर्षांनंतर झाडांना चांगले रसाळ सफरचंद आले. बाग बहरलेली दिसून येत आहे. या फळाची तोडणी केल्यानंतर स्थानिक बाजार पेठेत विकायला आणणार असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
स्ट्रॉबेरी, केशर पिकाचीही लागवड केली जाते-
पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. उंच डोंगरांमुळे या ठिकाणी थंड हवामान असते. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी पारंपरिक स्ट्रॉबेरी (Strawberry) तसेच केशर (Saffron) पिकाचेही शेतकऱ्यांनी उत्पादन (Production) घ्यायला सुरुवात केली आहे. केशर लागवडी यशस्वी झाल्यानंतर त्यांनी सफरचंद पिकाची शेती करून पाहिली, या फळांकडे बघून कळत आहे की शेतकऱ्यांचा दुसरा प्रयोगही यशस्वी झाला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :