यशोगाथा

कष्टाला यशाची थाप ! अहमदनगर जिल्ह्यातील तरुण शेतकरायची यशोगाथा; डाळिंब शेती तुन 15 लाख रुपयांचे नफा…

लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायांना तळा बसला आणि नेहमी प्रमाणे यावेळी सुध्दा शेतकऱ्याची कंबर मोडल्या गेली. जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा अडचणीत सापडला. पण म्हणतात न की प्रत्येक अडचणींवर मात केली जाऊ शकते जर मनात ध्येपूर्तीसाठी जिद्द आणि काम करण्याची चिकाटी असली तर.

अहमदनगर जिल्ह्यातील शशांक कडू ज्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ऐक उत्तम उदाहरण तरुण शेतकऱ्यांसमोर ठेवलय.

२०१६ साली बिएससी ॲग्री चे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीच्या अनेक संध्या नाकारून शेती करण्याचे ठरवले.

पारंपरिक शेती वगळून त्याच शेतीत आधुनिक पदधतीने शेती करण्याचे ठरवले आणि यश मिळवले.

गेल्या चार ते पाच वर्षापासन शशांक कडू डाळींबाच्या बागांसह इतर पिकांचे उत्पादन घेत आहेत. पण हे वर्ष आधीच घातक ठरल आणि त्यात आणखी भर म्हणजे तेल्या रोगाने डाळींबाच्या पिकावर हल्ला केला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना बागांमध्ये नांगर फिरवाव लागलं .

पण शशांक चे योग्य कष्ट, ध्येयनिष्ठत‌ा आणि नियोजनाने केवळ साडेतीन एकरात वीस टन डाळींब उत्पादन झाले आणि ज्यामुळे त्यांना पंधरा लाख रुपयांचा नफा झाला. त्यांच्या डाळींबाला १०० किलो चा भाव मिळून बांग्लादेशात निर्यात करण्यात आला. आणि आत्ता त्याच्या आधुनिक शेतीची माहिती ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.

शशांक कडूचे कष्ट खरंच कौतुकास्पद आहे. शेतीला वा रोगाला दोष न देता कष्टाच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या शशांक चे खूप खूप अभिनंदन.

WEB TITLE: Success to hard work! Success stories of young farmers in Ahmednagar district; Pomegranate farming makes a profit of Rs 15 lakh …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button