यशोगाथा : ऊसतोड करणारा लाटेवाडी आबा आईएएस( IAS) मध्ये देशात एकविसावा (२१) ऐका; आबाच्या जिद्दीचा प्रवास…
Success Story: Listen to the twenty-first (21) in the country in the cane-cutting Latewadi Aba IAS; Father's stubborn journey
घरच्या परिस्थितीची व आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर कोणतेही ध्येय, उद्दिष्ट साध्य होतेच, असा विश्वास मेंढपाळ (Shepherd) पुत्र आबा लवटे यांनी व्यक्त केला काय आहे यांच्या जिद्दीची कहाणी पाहुयात.
घरची परिस्थिती (Home conditions) बेताची असल्यामुळे त्यांच्यापुढे त्यांच्यापुढे लहानपणापासून असे कोणते उद्दिष्ट किंवा ध्येय (The goal) नव्हते परंतु परिस्थिती माणसाला जगणे शिकवते याप्रमाणे लहानपणीच हलाखीचे दिवस व परिस्थितीने दिलेले चटके यामुळेच कुटुंबाची परिस्थिती कशी बदलावी याचा सातत्याने विचार करणाऱ्या आबा यांना यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळाले.
याबद्दल बोलताना आबा लवटे म्हणतात माझ्या यशाच्या आनंदापेक्षा आई वडिलांना सुख मिळणार हाच माझा खरा मोठा आनंद आहे.
हेही वाचा : सोयाबीनचे किमतींमध्ये विक्रमी वाढ शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे का?
सांगोला तालुक्यातील लाटेवाडी चा मेंढपाळ पुत्र आबा लवटे अत्यंत खडतर परिस्थितीत जिद्द चिकाटी मेहनत (Hard work) आणि संघर्षाच्या जोरावर मात करत त्यांनी आकाशाला गवसणी घालत उत्तुंग यश मिळवले. अनेक वेळा अंगमेहनतीची (Hard work) आणि कष्टाची काम करत आबा लवटे यांनी आजच्या पिढीला एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे.
आबांना देखील आपल्या लहान भावंडासह मेंढ्या मागं राहावं लागायचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांसोबत जाऊन ऊसतोडी करता करता जमेल तशी शाळा शिकली. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्यांना दररोज बारा किलोमीटरचा प्रवास सायकलीवरून करावा लागत असे.
इंजिनीअरिंगचे (Of engineering) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गेट (Gate) परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू केला व या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी वाटू लागली, त्यांनी स्पर्धा परीक्षेची माहिती घेत असतानाच अभियांत्रिकी (Engineering) विभागाशी संबंधित अनेक खात्यांमध्ये नोकरीची संधी असे त्यांच्या लक्षात आले, लॉकडाऊन च्या काळात त्यांनी पुरेपूर अभ्यासाला झोकून दिलं आणि 12 एप्रिल 2021 मध्ये त्यांनी upsc परीक्षेत देशामध्ये एकविसावा नंबर प्राप्त केला.
हेही वाचा: “अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…
त्यांच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे जिद्द व कष्ट असतील त्याचबरोबर आई वडिलांच्या कष्टाची (The hardships of mother and father) जाणीव असेल तर कोणताही परिस्थितीत यश प्राप्त करण्याची मनगटा मध्ये ताकद निर्माण होते, हे आबा लवटे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
हेही वाचा : भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?
हेही वाचा :
1)डोंगर कड्यावरचा रानमेवा “करवंद”, वाचा त्याचे गुणधर्म किती आहेत महान…
2)कोरोणा मुक्त झाल्यानंतर, रुग्णांमध्ये आढळतात,”हे” गंभीर आजार…
4)शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! “या” हमीभावाने गहू खरेदी होणार सुरू…