कृषी बातम्या

Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेच्या अनुदानात वाढ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Subsidy | राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत फळबाग लागवड किंवा बांधावरील वृक्ष लागवड, सलग क्षेत्रातील वृक्ष लागवड, फुल पीक शेती (Agriculture) करण्यासाठी अनुदान दिले जाते. याचं अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यात या मनरेगाअंतर्गत (MGNREGA Scheme) राबवल्या जाणाऱ्या फळबाग, वृक्ष लागवड, फूल पीक शेती (Agricultural Information) यामध्येही वाढ होण्यासंदर्भात एका नवीन अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आलेली आहे.

वाचा: पशुपालकांनो पावसाळ्यात ‘अशी’ घ्या गाभण शेळ्यांची काळजी

योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड आणि फुलपीक लागवड योजनेअंतर्गत (financial) आर्थिक मापदंडाबाबत. या शासन निर्णयामध्ये नवीन मनरेगाअंतर्गत अकुशलसाठी देण्यात येणारी 256 रुपये प्रतिदिन ही मजुरी ग्राह्य धोरण या मजुरीच्या आधारे 15 जुलै 2022 रोजी कसे आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी परिशिष्ट जोडण्यात आलेले. याच परिशिष्टाच्या माध्यमातून नवीन अंदाजपत्रक देण्यात आलेले आहेत.

कोणत्या बाबींसाठी मिळणार अनुदान?
या योजनेंतर्गत यामध्ये आंबा लागवड, काजू, चिकू, पेरू, डाळींब, संत्री, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर त्याचप्रमाणे सीताफळ, आवळा, चिंच आणि जांभूळ, कोकम, फणस, अंजीर अशा प्रकारची विविध फळांची लागवड आहे. सुपारी, शेवगा, बांबू नवीन ड्रॅगन फ्रूटची लागवड यासाठी अंदाजपत्रकानुसार दिला जाणारा खर्च देण्यात आला आहे. ज्यामध्ये लागवड पूर्व काम, जमीन तयार करणे, खड्डे, लागवडीसाठी संवर्धन, माती शेणखत घालणं अशा प्रकारची जी काही विविध प्रकारची काम आहेत. या कामासह या लागवडीसाठी खर्च दिला जाणार आहे.

वाचा: घरात सोन ठेवत आहात! सावधान आता इतकेच सोन ठेवता येणार घरात

शेतकऱ्यांना दिलासा
तसेच या योजनेच्या अनुदानासाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना सादर करण्यात आलेल्या याच नवीन इस्टिमेटनुसार सादर करणे आवश्यक असणार आहे. याप्रमाणे मनरेगाअंतर्गत फुल पीक लागवडीसाठी अनुदान दिले जाते. या फुलपीक लागवड यासाठी इस्टिमेटसुद्धा याअंतर्गत देण्यात आलेले आहेत. आता अनुदानात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा देखील होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Increase in subsidy of scheme, farmers will get big benefit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button