ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Subsidy | शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! वराह पालनासाठी ‘या’ योजनेतंर्गत मिळतंय अनुदान, जाणून घ्या कसा करावा अर्ज?

Farmers work news! Grants are available under this scheme for cattle breeding, know how to apply?

Subsidy | महाराष्ट्र सरकारने वराहपालनासाठी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 50 मादी आणि 5 नर ते 100 मादी आणि 10 नर या प्रमाणात वराहपालन युनिट उभारण्यासाठी लाभार्थ्यांना 15 लाख ते 30 लाख रुपये अनुदान दिले जाईल. या योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे आणि पशुची उत्पादकता वाढवणे हा आहे.

अर्ज कसा कराल?
अर्जदारांना https://www.nlm.udyamimitra.in या पोर्टलवर अर्ज करायचा आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:

सविस्तर प्रकल्प प्रस्ताव

 • प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • अनुभव प्रमाणपत्र
 • जमिनिशी सबंधित कागदपत्र (स्वतःची किंवा भाडेकरार) 7/12
 • प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीओ टॅग छायाचित्र
 • स्वतःचे भांडवल/बँक किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज बाबत पुरावा
 • पॅनकार्ड
 • वास्तव्य पुरावा
 • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • कॅन्सल बँक चेक
 • आधार कार्ड
 • अर्जदाराचा फोटो
 • जात प्रमाणपत्र
 • शैक्षणिक प्रमाणपत्र
 • भागीदारी करार
 • वस्तु व सेवाकर नोंदणी प्रमणपत्र (लागु असल्यास)
 • कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (FPO, FCO, Sec.8 कंपनीकरीता)
 • मागील 3 वर्षाचा ऑडीट रिपोर्ट (लागु असल्यास)
 • मागील 3 वर्षाचा आयकर विवरणपत्र (लागु असल्यास)
 • पात्रता निकष

वाचा : Rabbit Farming | ससा पालनातून मिळतोय दुप्पटीने नफा! वर्षाला कमावू शकता 10 लाखांचा नफा, जाणून घ्या कसा?

अर्जदार स्वतः किंवा त्यांच्याकडील तज्ञ हे प्रकल्पाशी संबंधीत प्रशिक्षित तसेच अनुभव असणे आवश्यक.
अर्जदारास त्याचे खाते असलेल्या शेड्युल्ड बँकेकडून संबंधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र आवश्यक.
प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडेतत्वावरची जमीन आवश्यक तसेच KYC साठी आवश्यक कागदपत्रे.

अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशूधन विकास अधिकारी यांचाशी संपर्क साधावा.

योजनेचे फायदे

 • या योजनेमुळे वराहपालन व्यवसायाला चालना मिळेल.
 • रोजगार निर्मिती होईल.
 • पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा होईल.
 • पशुची उत्पादकता वाढेल.
 • अशाप्रकारे, महाराष्ट्र सरकारने वराहपालनासाठी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आणि उद्योजक वराहपालन व्यवसायात उतरून आर्थिक लाभ मिळवू शकतात.

हेही वाचा :

Web Title: Farmers work news! Grants are available under this scheme for cattle breeding, know how to apply?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button