ताज्या बातम्या

पुण्यामध्ये कडकडीत निर्बंध! पहा काय सुरु व काय बंद तसेच कोरोनाच्या डेल्टा प्लसची लक्षणे, व घ्यावयाची काळजी…

Strict restrictions in Pune! See what's on and off, as well as Corona Delta Plus symptoms, and precautions to take

महाराष्ट्राचे (Of Maharashtra) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, महाराष्ट्रामध्ये वेळेच्या आधी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे, भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू (Corona virus) उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन (Mutation) घडून डेल्टा प्लस (Delta Plus) हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे.

पुण्यात देखील आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे.(In Pune too, changes have been made in the earlier rules.)

सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.

मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.

हेही वाचा :जून महिन्यात करा बँकेची ‘ही’ महत्त्वाची कामे, अन्यथा सोसावे लागेल आर्थिक नुकसान…

[metaslider id=4085 cssclass=””]

खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.

अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.

लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक

अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी

कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील

चला पाहुयात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारची लक्षणे (Let’s look at the symptoms of Corona Delta Plus type)

कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटमध्येही बरीच लक्षणे दिसू लागली आहेत.

कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा.

कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या तीव्र लक्षणांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अशा लक्षणांचा समावेश आहे.

याशिवाय त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल यासारखे लक्षणेही दिसून येतात.

सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसार यांचा समावेश आहे.

हेही वाचा :अबब! एकच झाडाला बावीस जातीचे सातशे आंबे, पहा कोणी केली ही किमया, वाचा सविस्तरपणे…

कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट कसा टाळता येईल? (How to avoid the Delta Plus variant of the Corona?)

-घराबाहेर पडताना दुहेरी मास्क घाला.

-आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा.

-20 सेकंद तरी साबणाने आपले हात स्वच्छ धुवा.

-सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, लोकांपासून 6 फूट अंतर ठेवा.

-घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा आणि निर्जंतुकीकरण ठेवा.

-बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा आणि त्वरित स्पर्श करू नका.

हेही वाचा :

सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठी पहा कुठे आहे, नोकरीची संधी…

ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button