कृषी बातम्या

बियाणे वाटपाचे अनुदान सुरू; पहा कसा घ्याल लाभ..

Start seed distribution grants; See how to take advantage ..

अनुदान बियाणे वाटपातील एक महत्वपूर्ण माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या अभियानातंर्गत शेतकर्यांना खरीब रब्बी हंगामासाठी अनुदानावरती बियाणे वाटप पिक प्रात्यक्ष विविध प्रकारची कृषी अवजारे आणि सिंचन साधनांमध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन तसेच कृषी पंप असतील पाईप असतील अशा सर्व विविध बाबींना अनुदान दिलं जातं.

या योजने अंतर्गत रब्बी हंगामासाठी गहू ज्वारी करडई मका हरभरा अशा विविध बियाणांच्या अनुदाणासाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करता येतील यावरती कित्ती अनुदान असणार आहे. याप्रमाणे अर्ज कधी करता येणार आहेत याची अंतिम तारीख काय आहे आपण याची पूर्ण माहिती घेणार आहे.

‘महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती…

अर्ज मागवण्यासाठीचे २३ ऑगस्ट २०२१ चे पत्रक –

महाडीबीटी पोर्टल वरती प्रमाणित बियाणे वितरण पिक प्रात्याक्षिके, सुधारित कृषी अवजारे व सिंचन सुविधा साधने या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे त्यासोबत प्रेस नोट देखील जोडण्यात आलेली आहे.

ज्यामध्ये सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्ये पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण पिक प्रात्याक्षिके , सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकर्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत.

पिक प्रात्याक्षिक शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पिक प्रत्याक्षिकासाठी अर्ज करताना संबंधित कृषी साह्ययाशी संपर्क करून १० हे. शेती असणार्या गटांनी नोंदणी करावी. शेतकर्यांना नोंदणी करण्यासाठी दि ३० ऑगस्ट २०२१ पासून दि. १० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकर्यांचाच विचार केला जाईल.

‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्‍लिकवर…

या खालील जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जात आहे…

  • गहू – सोलापूर , बीड, नागपूर.
  • कडधान्य (हरभरा ) – राज्यातील सर्व जिल्हे.
  • भरडधान्य ( मका ) – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर सांगली, औरंगाबाद, जालना.
  • पौष्टिक तृणधान्य – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, ओरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
  • गळीत धान्य – सांगली ,बीड ,लातूर , उस्मानाबाद , नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, चंद्रपूर.

एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देणार आहेत. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकर्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ असणार आहे.

शेतकऱ्याच्या एक एकरच्या मर्यादित एका पिकासाठी सबंधित पिकाच्या प्रकारानुसार रुपये दोन हजार ते ४ हजार प्रती एकर मर्यादेत DBT तत्वावर अनुदान देण्यात येणार आहे. वेळेत अर्ज करणार्या शेतकर्यांची लॉटरी काढून निवड करणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button