Yojana | भारतातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. पशुपालन केल्यामुळे शेतकऱ्यांना (Dairy Business) दुग्ध व्यवसायातून आर्थिक (Financial) मदत होते. तर शेतकऱ्यांना पशुपालनाकरता प्रोत्साहन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry) विविध योजना राबवल्या जातात. ज्यासाठी शेतकऱ्यांना (Department of Agriculture) सतत अर्ज करून लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात येते. आता नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाचा: आंतरजातीय विवाह आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात कडक कारवाईची तयारी! शिंदे सरकारने उचललं मोठं पाऊल
नावीन्यपूर्ण योजना
शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळी आणि मेंढी पालनासाठी तसेच कुक्कटपालनासाठी अनुदान (Subsidy) देण्याकरता विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच असणारी एक योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना (Farming) होय. याच नाविन्यपूर्ण योजने संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या नाविन्यपूर्ण योजनेसाठी पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Agriculture) अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आला आहे.
राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! शासनचं एका झटक्यात मिटवणार 50 वर्षांचा भाऊबंदकीच्या जमिनीचा वाद
तब्बल 75 टक्के मिळतय अनुदान
पशुपालन आणि कुक्कटपालनासाठी अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांना (Farming) 75 टक्के अनुदान या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत मिळते. तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळते. ही योजना राज्यस्तरावर राबवली जाते. तर या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी (Agribusiness) अनुदान मिळत आहे.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! बाजारात घटली कापसाची आवक; विक्रीची घाई करू नका, दरात होणार मोठी वाढ
‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
नाविन्यपूर्ण योजनेसाठी शेतकऱ्यांना 17 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्याचे आले आहे. यासाठी शेतकरी AH-mahabms scheme यावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या अंतर्गत शेतकरी गाय, म्हशी, शेळी, मेंढी, कुक्कटपालनपालन यासाठी 75 टक्के आणि 50 टक्के अनुदानावर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- नाद करायचा पण उडदाचा नाय बरका! मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या इतर शेतमालाच्या दराची स्थिती काय?
- पशुपालकांसाठी खुशखबर! दुधाचा व्यापारही वाढणार अन् जनावरांच्या रोगाचा खर्चही संपणार, कसं ते जाणून घ्या…
Web Title: Application for 75 percent subsidy under this scheme for cow-buffalo, goat-sheep and poultry rearing, know last date