चांगल्या बिझनेसच्या विचारात असाल तर या बिजनेसची माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. Fly Ash Bricks च्या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल करू शकता. या व्यवसायाबद्दल सविस्तर माहीती घेऊया..
वाचा –
तुमच्याकडे मोकळी जमीन असेल तर तुम्ही देखील या विटांचा स्टार्टअप बिझनेस (Startup business) सुरू करू शकता. या बिझनेससाठी मुद्रा योजनेतूनही कर्ज (Currency plan loan) मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. सध्याच्या काळात घर आणि इमारती निर्माण करण्यासाठी लाल विटांऐवजी थर्मल पावर प्लांटच्या कोळश्याच्या राखेपासून बनवणारी विट वापरली जाऊ लागली आहे. या विटांचा वापर शहरेच नाही तर ग्रामीण भागातही सुरू झाला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आय़ोग (KVIC) च्या रिपोर्टमध्ये राखेतून विट बनवण्याच्या उद्योगाचा पूर्ण आराखडा (Outline) तयार करण्यात आला आहे. यानुसार Fly Ash Bricks चा स्टार्टअप करण्यासाठी 20.30 लाख रुपये खर्च येतो. बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता. तसेच मुद्रा लोनची देखील मदत मिळू शकते.
राख अशी मिळवा –
सर्वात पहिल्यांदा हा बिझनेस (business) सुर कऱण्यासाठी कच्च्या मालाच्या स्वरूपात पावर प्लांटमधून निघालेल्या राखेची गरज असते. ऊर्जा मंत्रालयाने (Ministry of Energy) यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. लिलावानंतरही राख उरली असेल तर मोफत राख तुम्ही घेऊन जाऊ शकता. परंतु पहिल्यांदा येणाऱ्याला पहिले प्राधान्य अशा आधारावर ही राख देण्यात येईल. KVIC प्रोजेक्टनुसार 5 लाख विटा 40 लाखात विकता येतील. सर्व खर्च जाऊन बरेच पैसे राहू शकतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा