ताज्या बातम्या

SSC Result | दहावीचा निकाल लागला रे..! महाराष्ट्रात पुन्हा मुलींनीचं मारली बाजी, 95.81 टक्के लागला निकाल

SSC Result | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर केला आहे. यंदाचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली आहे तर नागपूर विभाग मात्र तळाशी आहे.

विभागनिहाय निकाल:

 • कोकण – 99.01%
 • पुणे – 97.82%
 • छत्रपती संभाजीनगर – 97.54%
 • मुंबई – 97.31%
 • कोल्हापूर – 96.78%
 • अमरावती – 96.52%
 • नाशिक – 96.41%
 • लातूर – 96.23%
 • नागपूर – 94.73%

Car | कार चालवताना कोणती कागदपत्रे सोबत ठेवावी? दंड टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काय आवश्यक आहे?

मुली पुन्हा पुढे:
निकालांमध्ये मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे.

18 विषयांमध्ये 100%:
एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे.

निकाल कसा पाहाल?

 • विद्यार्थी (https://mahresult.nic.in), [https://sscresult.mkcl.org, [https://sscresult.mahahsscboard.in, [https://results.digilocker.gov.in, [https://results.targetpublications.org/] या वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहू शकतात.
 • विद्यार्थ्यांना त्यांचा लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नाव नोंदवून निकाल पाहता येईल.
 • निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करता येईल किंवा त्याची प्रिंट आऊट घेता येईल.

महत्वाचे मुद्दे:

 • यंदाच्या दहावी परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
 • दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत काही दिवसांनंतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button