“या” कृषी बाजारपेठेत 4.97 कोटी किमतीच्या सोयाबिनची उलाढाल; सोयाबीन उत्पादकांना मिळाला दिलासा..
शेतकऱ्यांसाठी (farmers) दिलासादायक बातमी आहे. वर्धा कृषी उत्पन्न (Agricultural income) बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली आहे. आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना (farmers) दिलासा मिळालेला आहे.
वाचा –
तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल –
एकूणच दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीस सुरू राहिलेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला. तर पीक (crop) कापणीला आले असतानाही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन (soybeans) उत्पादकांच्या पदरी नापिकी येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात पावसाने विश्रांती घेताच जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean) उत्पादकांनाही दिलासा मिळाला.
वाचा –
पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean) उत्पादकांनी सोयाबीन कापणी व मळणीच्या कामांना गती देत सोयाबीन पीक घरी आणले. दिवाळी हा सण येत्या काही दिवसात आहे तर दिवाळी चांगली व्हावी या हेतूने काही शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहेत. वर्धा बाजारपेठत आतापर्यंत ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी (Buy soybeans) करण्यात आली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –