सोयाबीन बियाणे महागले ! महाबीज प्रशासनाची मात्र मोठी कसरत..
Soybean seeds are expensive! Mahabeej administration, however, a big exercise .. Read detailed news
यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. सोयाबीनचा तुटवडा असल्यामुळे व जास्त मागणी असल्यामुळे सोयाबीन नुकताच सहा हजार दर रुपयांचा टप्पा गाठला त्यामुळे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी महाबीज प्रशासनाला किमतींमध्ये वाढ न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे महाबिज प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागते.
सोयाबीनची लागवड या हंगामात 43.53 हेक्टर इतकी होती मात्र सोयाबीनला यावर्षी चांगला दर मिळेल या कारणांमुळे यावर्षी शेतकऱ्यांचा कल लागवडीकडे राहू शकतो. त्यामुळे कदाचित बियांना पुढील वर्षी मागणी अधिक होणार नाही असे वाटते. राज्यामध्ये लागणाऱ्या सोयाबीन बीयांनाच्या मागणी मध्ये तीन लाख क्विंटल इतका वाटा महाबीज प्रशासनाचा असतो. बाकीची गरज ही खाजगी कंपनी पूर्ण करत असते मागील आठवड्यात कृषी मंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दरवाढ करू नका असे सांगितले होते तसेच सध्या परिस्थिती वेगळी असल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.
महाबीज प्रशासन हे आपल्या बीज उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भावापेक्षा अधिक दर देते. हे दर ठरवताना प्रक्रिया वाहतूक व इतर खर्च ठरवून बियाण्यांचा दर निश्चित केला जातो. यंदा मात्र सोयाबीन बाजारपेठेत 5000 पासून विक्री चालू झाली आहे शिवाय सोयाबीन वर पावसाचा परिणाम झाला आहे अशा परिस्थितीमध्ये चांगले सोयाबीनचे पीक कमी दरात मिळणे जवळजवळ अशक्यच आहे. त्यामुळे सोयाबीनचे बियाणे दरांमध्ये वाढ केल्याशिवाय पर्याय नाही असे एका जाणकार व्यक्तीचे म्हणणे आहे.