Soybean Rate | आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढले; भारतीय बाजारातही सोयाबीनचे दर सुधारणार
Soybean Rate | सध्या शेतीतील पिके काढणीला आलो आहेत. ज्यात सोयाबीन पिकाचा देखील समावेश आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) केली जाते. परंतु बाजारात सध्या सोयाबीनचे दर (Soybean Rate) घसरत आहेत. तर दुसरीकडे जागतिक बाजारात अमेरिकेतील सोयाबीनचे दर (Financial) वाढू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनो (Agriculture) भारतीय बाजारात सोयाबीनचे दर कसे असतील हे जाणून घेऊयात.
सोयाबीन आलंय काढणीला पण पावसाचा होतोय परिणाम
सध्या शेतीतील (Agricultural Information) सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र, परतीच्या पावसाचा सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फ्तका बसत आहे. या पावसामुळे शेतकरी शेतीतील (Agriculture in Maharashtra) सोयाबीनची काढणी करू शकत नाहीत. तर दुसरीकडे पावसामुळे सोयाबीन ओलसर राहत आहे. त्यामुळे काढणीला विलंब होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढले
यंदा अमेरिकेत दुष्काळ जाणवतोय. त्यामुळे याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. याचप्रमाणे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनावर याचा परिणाम होत आहे. तसचं चीनने अमेरिकेकडून सोयाबीनची आयात वाढवलीय. तरी देखील चीनची आयात कमी आहेच. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर टिकून आहेत. दर पाहिले तर शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे 13.65 डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले आहेत.
भारतातील सोयाबीनचे दर सुधारणार?
मागच्या हंगामात सोयाबीनला सुरुवातीला 7 हजार रुपयांचा दर मिळाला. तर शेवटी तीन महिन्यांत या दराने 5 हजारांची नीच्चांकी पातळी गाठली होती. तर सध्या बाजारात सोयाबीनचा प्रत आणि ओलावा पाहता 4 हजार 600 ते 5 हजार 200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. त्याचवेळी बाजारात सोयाबीनची आवक वाढली तरी देखील सोयाबीनला 5 हजारांचा दर मिळेल. यापेक्षा दर कमी होणार नाहीत असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दराबाबत दिलासा मिळू शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- पीएम किसानचा 12वा हप्ता ‘या’ दिवशी होणारं खात्यात जमा; त्यापूर्वीच जाणून घ्या लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर कोणाला मिळणार लाभ?
- बाजारात कापसाचे दर टिकून; पण शेतकऱ्यांनी कधी करावी विक्री? यासह जाणून घ्या यंदाची सोयाबीन दराची स्थिती
Web Title: Soybean prices rose in the international market; The prices of soybeans in the Indian market will also improve