Soybean Rate | सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर! केंद्राने काढले सोयाबीनवरील स्टॉक लिमिट; आता दरात होणार मोठी वाढ…
सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढले –
केंद्र सरकारने ( Government) खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टाॅक लिमिट ( Stock limit ) काढण्याचा निर्णय घेतला आहे व या मुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळेल .आंतरराष्ट्रीय बाजारात (International Soybean Market) दर वाढललेले असतनाही देशातील दर काहीसे कमीच आहेत.मात्र स्टाॅक लिमिटमुळे मोठी किरकोळ विक्री साखळी आणि घाऊक व्यापाऱ्यांना व्यवहार करणे अवघड होत आहे. तसेच सध्या स्टाॅक लिमिट २००८ मध्ये ठरवले गेले. त्यावेळी मोठ्या किरकोळ विक्री साखळ्या नव्हत्या. त्यामुळे या उद्योगांना सध्याच्या स्टाॅक लिमिटमध्ये काम करताना अडचणी येत होत्या. त्यातच सध्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय ( International Market)बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं स्टाॅक लिमिट काढण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयानं म्हटले आहे.
स्टाॅक लिमिट काढल्याचा फायदा असा होनार –
स्टाॅक लिमिट काढल्याचा फायदा सोयाबीनला होऊ शकतो, असे शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री यांनी सांगितले. सध्या देशातील बाजारांमध्ये सोयाबनची आवक वाढली आहे. त्यामुळे सोयाबीन दर काहीसे दबावात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील काही दिवसांमध्ये वाढले.मात्र देशातील सोयापेंडला( Soya cake ) निर्यातीसाठी कमी मागणी, स्टाॅक लिमिट आणि वायदेबंदीमुळे देशातील दर (Soybean Rate)त्याप्रमाणात वाढले नव्हते. आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टाॅक लिमिट काढले. त्यामुळे व्यापारी आणि संस्थांना तेलबिया आणि खाद्यतेलाचा साठा करता येईल.स्टाॅक लिमिट काढल्याने बाजाराला आधार मिळू शकतो, असे शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनीही सांगितले. सरकारने स्टाॅक लिमिट काढल्याने सोयाबीन बाजाराला(Soybean Rate) आधार मिळू शकतो.
सोयाबीनचे दर असे आहेत –
सरकारच्या या निर्णयानंतर आज सोयाबनच्या दरात काहीशी सुधारणा झाली. सोयाबीनचा सरासरी दर आता ४ हजार ९५० रुपयांवर पोचला आहे. तर बऱ्याच बाजारांमध्ये सोयाबीनचे दर ५ हजार १०० रुपयांपर्यंत(Soybean Rate) पोचले होते. बाजारात सध्या सोयाबीनची आवक जास्त असली तरी दर किमान ५ हजारांपर्यंत असू शकतात तर पुढील काही दिवस दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.व्यापारी आणि स्टाॅकिस्ट सोयाबीनची जास्त खरेदी करू शकतात.स्टाॅक लिमिट काढल्याने स्टाॅकिस्ट बाजारात उतरतील. त्यामुळे दराला( Soybean Rate)आधार मिळेल.शेतकऱ्यांनी ५ ते ६ हजार रुपयांची दरपातळी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
Nice news