Soybean Rate | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात ‘इतकी’ वाढ; जाणून घ्या किती मिळतोय दर?
दिवाळीच्या काळातही सोयाबीन काढणी –
दिवाळीच्या काळात सुद्धा शेतकरी सोयाबीन काढणीच्या करत आहे . गेल्या आठवडाभरापासून राज्यात
पाऊस नाही . कमी पावसामुळे सोयाबीनमधील ओलावा कमी होण्यास मदत होत आहे . देशातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता हळूहळू वाढत आहे . तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली.
सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा –
मराठवाडा, विदर्भ आणि इतर सोयाबीन उत्पादक प्रदेशात पावसामुळे पिकाची गुणवत्ता कमी झाली .त्यामुळे शेतकरी मळणीनंतर लगेचच सोयाबीन विकण्यास प्राधान्य देतात. चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे उत्पादन शेतकरी बंद करत आहेत. या आठवड्यात अनेक बाजार समित्या बंद राहिल्याने शेतकऱ्यांनी शिवारातच सोयाबीन विकले. सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने सध्या या मालाची किंमत 4,200 ते 4,600 रुपये प्रतिक्विंटल आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे शेतकरी सोयाबीन सुकवत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापासून बाजारात येणार्या सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण कमी राहणार असल्याचेही शेतकरी व व्यापारी सांगत आहेत. सध्या विकल्या जाणाऱ्या सोयाबीनमध्ये जास्त आर्द्रता असलेल्या सोयाबीनचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे बाजारातील किमान दरांमध्येही काही प्रमाणात सुधारणा झाली आहे.
सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठे –
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे. सोयाबीनचा भाव १४ डॉलरच्या पातळीवर पोहोचला. डिसेंबर सोयाबीनचा वायदा आज 1,400 सेंट्स प्रति बुशेलवर बंद झाला. गेल्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची किंमत $13 ते $14 प्रति बुशेल आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन पेंडीचे भाव सुधारले तर देशांतर्गत बाजारालाही पाठिंबा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशाच्या बाजारपेठेत सोयाबीनच्या किमान भावात किरकोळ वाढ झाली आहे. एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला 5 हजार ते 5 हजार 200 रुपये भाव मिळत आहे.
सोयाबीनच्या सरासरी भावात वाढ –
सध्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत सोयाबीनचा सरासरी भाव 5 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बाजाराचा आढावा घेऊनच शेतकऱ्यांना सोयाबीन विकणे फायद्याचे ठरेल.