‘माझं घर माझं शेत’ आकाशवाणी कार्यक्रमातून सोनाली गोगळे यांच्याकडुन सोयाबीन उत्पादक संपत चिंचवडे यांची उद्या संध्याकाळी मुलाखत
Success Story | आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. जेथे निम्म्याहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर (Agribusiness) आपला उदरनिर्वाह करतात. शेतीतूनच सर्व उत्पन्न काढायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना जीवाचं रान करून आपल्या पिकाची काळजी घ्यावी लागते. आता बदलत्या काळात शेतकरी विविध पर्यायांचा अवलंब करून शेतीमध्ये (Department of Agriculture) विविध प्रयोग करत आहेत. तसेच काही शेतकरी शेतीमध्ये भरघोस उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करत आहेत.
यशस्वी सोयाबीन उत्पादक शेतकरी
नुकतच आता सोयाबीन पिकाचे (Soybean Crop) भरघोस उत्पन्न घेणारा यशस्वी शेतकरी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या भेटीला येणार आहे. संपत गणपत चिंचवडे यांनी सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यांना मिळालेले हे सोयाबीन पिकाचे यश इतर शेतकऱ्यांनाही मिळावे, यासाठी आता ते आकाशवाणीच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
माझं घर माझं शेत
शेतकऱ्यांसाठी ‘माझं घर माझं शेत’ या आकाशवाणी कार्यक्रमात सोयाबीन पिक घेणारे यशस्वी शेतकरी संपत गणपत चिंचवडे यांच्यासोबत सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद शुक्रवार दि. 16 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून प्रसारित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो या यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा ऐकायला विसरू नका.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- नाद करायचा पण उडदाचा नाय बरका! मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या इतर शेतमालाच्या दराची स्थिती काय?
- पशुपालकांसाठी खुशखबर! दुधाचा व्यापारही वाढणार अन् जनावरांच्या रोगाचा खर्चही संपणार, कसं ते जाणून घ्या…
Web Title: Interview with Soybean grower Sampat Chinchwade tomorrow evening from AIR program Mazhan Ghar Mazhan Shet