कृषी बातम्या

केंद्र सरकारच्या “या” चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन दरात होतेय फरपट ; वाचा काय घेतला निर्णय..

Soybean prices of farmers are falling due to "wrong" decision of the central government; Read what was decided ..

सोयामीलची गरज पोल्ट्री व्यवसाय, पशूखादय, माशांचे खाद्य यामध्ये असते. प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे पशु खाद्य म्हणून वापरतात. जगात चीन, भारत, अमेरिका या देशांमध्ये सोयमिल ची भरपूर प्रमाणात मागणी आहे. सोयमिल तुटवड्यामुळे निर्माण झालेली आर्थिक वाढ थांबवण्यासाठी पोल्ट्री व्यवसाय असोसिएशन ने मागणी केली त्यामुळे सोयामिल केंद्र सरकारने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ लाख मेट्रिक टन सोयामीलची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकार निर्णय जाहीर केल्या बरोबर बाजारातील सोयाबीनचे दर चार ते पाच रुपये प्रतिक्विंटलनी घसरले.

सोयाबिन पासून तेल काढल्यानंतर राहीलेला जो भाग असतो त्याला सोयमिल म्हणतात. चोथा असला तरी पौष्टिक व त्यामध्ये प्रोटीन असते. सोयाबीनच्या दराने यावर्षी 10 हजार च्या वर आकडा घाटला होता. सोयामिल या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना या दराचा देखील फायदा मिळाला नाही.

केंद्राच्या या चुकीच्या निर्णयामुळे देशातील शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने सोयामिल आयात चा निर्णय घेतल्याबरोबर सूर्यफूल व सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनचे दर तीन ते चार हजार रुपयांनी कमी झाले. या आयात धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसत आहे. पुढच्या महिन्यात सोयाबीन काढणी झाल्यानंतर कमी दराला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आताच दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मिळणाऱ्या दराची चिंता वाटू लागली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button