Soybean Rate | खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे (Farming) मोठे नुकसान झाले आहे. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते तर कधी मालाला रास्त भाव मिळत नाही. यावर्षीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना सोयाबीनला (Soybean Rate) कमी भाव मिळाल्याने शेतकरी वैतागले आणि त्यांनी सोयाबीन साठवणुकीचा आग्रह धरला. त्याचवेळी राज्यातील काही मंडईंमध्ये सोयाबीनच्या दरात (Soybean Market) किरकोळ वाढ दिसून येत आहे.
वाचा: केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केली ‘ही’ योजना; व्यवसायासाठी मिळणार तब्बल 25 लाख, त्वरित करा अर्ज
शेतकऱ्यांना सोयाबीन दरात दिलासा
सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील नगदी पीक आहे. मराठवाड्यातील शेतकरी सर्वाधिक सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) करतात. येथील शेतकरी केवळ सोयाबीनच्या लागवडीवर अवलंबून आहेत. अशा स्थितीत सोयाबीनला बाजारात योग्य भाव न मिळाल्यास बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) संकटाला सामोरे जावे लागते. सध्या सोयाबीनच्या भावात काहीसा दिलासा शेतकऱ्यांना दिसत आहे.
अतिवृष्टीत सोयाबीनचे झाले अधिक नुकसान
अवकाळी पावसामुळे सोयाबीन व कापूस (Cotton Rate) पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. त्याचवेळी पावसामुळे सोयाबीनचेही नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनच्या दाण्यांमध्ये ओलावा असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे (Department of Agriculture) नुकसान झाले आहे. आणि बाजारात आवक कमी दिसून येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात किरकोळ वाढ झाल्याने शेतकऱ्यांना (Type of Agriculture) दिलासा मिळाला आहे.
किती मिळतोय भाव?
यापूर्वी शेतकऱ्यांना सोयाबीनला प्रतिक्विंटल 2 हजार ते 3 हजार रुपये भाव मिळत होता आणि आता 5 हजार ते 5 हजार 650 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. याशिवाय बहुतांश समित्यांमध्ये सोयाबीनची (Soybean Market) आवकही घटल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादच्या बाजारात केवळ 70 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. जिथे किमान भाव 5 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 5 हजार 603 रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी 5 हजार 415 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- बिग ब्रेकिंग! आता ‘या’ प्रवर्गातील नागरिकांना मिळणार 10 टक्के आरक्षण; सर्वोच्च न्यायालयाकडून 103 वी घटनादुरुस्ती वैध
- आनंदाची बातमी! कापसाच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयांची वाढ; जाणून घ्या कसा राहील भाव
Web Title: Relief for soybean producers! There has been a increase in the rate, know how much the rate is getting