इतर

Soybean Market | शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना! सोयाबीनच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण; जाणून घ्या किती मिळतोय बाजारभाव

Soybean Market | राज्यात खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी पेरणीच्या तयारीत लागले आहे. या हंगामात सोयाबीन हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्यामुळे या पिकाला शेतकरी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवतात. मात्र, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारामध्ये सोयाबीनचे (Soybean Market) कमाल दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. चला तर मग सोयाबिनला (Soybean Rate) बाजारात किती दर मिळतोय? बाजारात सोयाबीनची आवक किती आहे? हे जाणून घेऊयात.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

सोयाबीनचे दर आणि आवक

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (भुसार मार्केट) सोयाबीन आवक आणि दर मंगळवार (ता. 4) सोयाबीनची आवक 305 क्विंटल एवढी आहे. तर किमान 4961 रुपये ते कमाल 5077 रुपये एवढा दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 4845 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. सोमवार (ता. 3) सोयाबीनची आवक 165 क्विंटल एवढी असून किमान 4850 रुपये ते कमाल 4950 रुपये एवढा दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 4900 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. शनिवारी (ता. 24) सोयाबीनची आवक 288 क्विंटल एवढी असून किमान 4800 ते कमाल 4950 रुपये एवढा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 4875 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कशी आहे दराची पातळी?

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. खाद्यतेलाचे दर दबावात असल्याने सोयाबीनचे दर दबावात आहेत. देशातील बाजारपेठेत सोयाबीन पिकाचा साठा पुरेसा प्रमाणात आहे. तसेच, यंदा बाजारात सोयाबीन आयातीचा दबाव शेतकऱ्यांनी वाढू दिला नाही. ज्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. त्यामुळे किमतीची पातळी स्थिर झाली आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Thirteenth month of drought for farmers! Soybean prices fall by so much Find out how much the market price is getting

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button