Onion Prices Unstable| सोयाबीन आणि कापसाच्या भावात घसरण, तुरी आणि हळदीला आधार, कांद्याचे भाव अस्थिर|
Onion Prices Unstable| :आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोयाबीन आणि कापसाच्या भावात घसरण सुरूच आहे. सोयाबीनचे वायदे ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान तर कापूस ५८ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर विकला जात आहे. यापुढील काही दिवस ही स्थिती (condition) कायम राहण्याची शक्यता आहे.
तूर आणि हळदीला मात्र आधार मिळाला आहे. तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार रुपये तर हळदीला १२ हजार ते १५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तूरीच्या भावात वाढ कायम राहण्याची तर हळदीच्या भावात काही करेक्शन येण्याची शक्यता आहे.
वाचा:Lifestyle|:तुळशीला पाणी देण्याचे नियम: रविवार आणि एकादशी टाळा
कांद्याचे भाव अस्थिर आहेत. पावसामुळे बाजारातील आवक (income) आणि मागणीवर परिणाम होत आहे. सध्या कांद्याचा सरासरी भाव २४०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल आहे. यंदा उत्पादन कमी झाले असल्याने आणि निर्यातबंदीमुळे यापुढे भाव वाढण्याची शक्यता आहे.
दूध भुकटी(Milk powder) आयातीसाठी अद्याप कोणताही अर्ज आला नाही. सरकारने नुकतीच दूध भुकटी (Milk powder) आयातीचा दर कमी केला आहे. तरीही आयातीसाठी व्यापाऱ्यांचा उत्साह दिसत नाही.