बाजार भाव

Soyabean Price Hike | शेतकऱ्यांनो आजही सोयाबीनचे दर वाढले! कापसाच्या दरातही वाढ, जाणून घ्या टोमॅटो, केळी आणि ज्वारीचे ताजे बाजारभाव

Soyabean Price Hike | राज्यातील शेती बाजारात सध्या विविध पिकांच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सोयाबीन (Soyabean Price Hike) आणि कापसच्या दरात काहीशी सुधारणा झाली असली तरी ज्वारीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. तर टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे.

सोयाबीन:
सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सध्या चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या मागणीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे भाव काहीसे वाढले आहेत. सध्या सोयाबीनचा सरासरी भाव ४५५० ते ४६५० रुपये प्रति क्विंटल आहे.

कापूस:
कापसाच्या दरातही (Cotton Rate) चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मागणीमुळे देशांतर्गत बाजारात कापसाचे भाव काहीसे वाढले आहेत. सध्या कापसाचा सरासरी भाव ६७०० ते ७६०० रुपये प्रति क्विंटल आहे.

टोमॅटो:
टोमॅटोची बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चांगली वाढ झाली होती. मात्र वाढलेल्या भावात मागणीवर काहीसा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. मात्र टोमॅटोचे वाढलेले सरासरी भाव कायम आहेत. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

वाचा: यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं तब्बल 139 कोटी, पाहा यादीत तुमचं नाव…

ज्वारी:
देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

केळी:
राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शेती बाजारात सध्या बदलत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी या बदलत्या परिस्थितीचा विचार करून आपले पिकांचे नियोजन करावे. सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य धोरणे आखावी.

हेही वाचा:

वृषभ, सिंह आणि धनु राशीसह ‘या’ लोकांना आर्थिक लाभाचा योग, वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

शेतकऱ्यांनो सोयाबीनचे दर वाढले! जाणून घ्या कापूस, कांदा आणि मोसंबी आणि आल्याचे ताजे बाजारभाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button