बाजार भाव

Soyabean Price Hike | सोयाबीन उत्पादकांची चांदी! आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले सोयाबीनचे वायदे, पाहा कांदा, कापूस, मक्याचे ताजे बाजारभाव

Soyabean Price Hike | महाराष्ट्रातील शेती बाजारात या काळात उतार-चढाव सुरू आहेत. कांदा, कापूस, सोयाबीन (Soyabean Price Hike), मका आणि लसूण या प्रमुख पिकांच्या दरात उल्लेखनीय बदल दिसून येत आहेत.

कांदा: गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Price) सुधारणा झाली आहे. रब्बी हंगामातील कांद्याची उपलब्धता कमी असून, खरिपातील कांद्याची आवकही अपेक्षेपेक्षा कमी आहे. दिवाळी सणामुळे मागणी वाढल्याने कांद्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या कांद्याचा भाव ४३०० ते ४८०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. (Soyabean Price Hike)

वाचा: शेतकऱ्यांनो आजही सोयाबीनचे दर वाढले! कापसाच्या दरातही वाढ, जाणून घ्या टोमॅटो, केळी आणि ज्वारीचे ताजे बाजारभाव

कापूस: आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात उतार-चढाव सुरू आहेत. देशांतर्गत मागणीचा परिणाम दरावर दिसून येत आहे. देशांतर्गत बाजारात कापसाचा सरासरी भाव ६७०० ते ७६०० रुपये प्रति खंडीवर आहे.

सोयाबीन: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. वाढलेली मागणी आणि गुंतवणूक वाढल्याने सोयाबीनच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. देशांतर्गत बाजारात प्रक्रिया प्लांट्सने खरेदीचे भाव ४५५० ते ४६५० रुपयांच्या दरम्यान ठरवले आहेत.

वाचा: न्यूझीलंड फलंदाजीचा घेतला निर्णय! हेन्रीला सँटनर; भारताने केले तीन बदल

मका: खरिपातील मक्याची आवक सुरू झाल्यानंतर मक्याच्या दरात नरमाई आली होती. परंतु, मागील काही आठवड्यांपासून बाजारभाव स्थिर झाला आहे. देशांतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये मक्याला १८०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे.

लसूण: बाजारात लसणाचे भाव तेजीत आहेत. बाजारात लसणाची आवक कमी असून, नवा माल बाजारात खूपच कमी प्रमाणात येत आहे. सणामुळे लसणाला चांगला उठाव आहे. सध्या बाजारात लसूण २०००० ते २५००० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे.

हेही वाचा:

दिवाळीच्या दिवशी देशातील ‘या’ भागात लावले जातात राक्षसी दिवे! फायदे जाणून तुम्हीही लावाल राक्षसी दिवे

दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारचं सामान्यांना मोठं गिफ्ट! १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर, तुम्हाला मिळणारं का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button