लवकरच लाल, सोनेरी आणि जांभळा कापूस शेतशिवारात दिसणार आहे; पहा सविस्तर…
लवकरच लाल, सोनेरी आणि जांभळा कापूस शेतशिवारात दिसणार आहे; ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विज्ञान संस्था ला कापूस विकसित करण्यात यश
ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विज्ञान संस्था, सीएसआयआरओच्या प्रयोगशाळेमध्ये संशोधकांनी जनुकीयदृष्ट्या सुधारित (जीएम) कापूस विकसित करण्यात यश मिळविले आहे. प्रयोगशाळेत कपाशीचे रंगीत उती (कलर्ड टिश्यू) तयार केले आहेत. पुढील काही महिन्यांत संशोधक या उतींद्वारे नवीन कपाशीची नियंत्रित वातावरणात लागवड करणार आहेत.
– डॉ. कॉलिन मॅकमिलन
कापसाचे फायदे काय?
कपाशी पुनरुत्पादन करण्यास सक्षम राहणार आहे. आणि कपाशीपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांपासून (फायबर) थेट रंगीत वस्त्र बनविता येणे शक्य होणार आहे.
वस्त्रांना अन्य कोणत्याही प्रकारे रंगरंगोटी (डाय) करण्याची गरज भासणार नसल्याचा या संशोधकांचा दावा आहे आणि थेट रंगीत कापड तयार मिळणार आहे.
पाण्याची बचत आणि इकोफ्रेंडली सुद्धा
रंग तयार करण्या साठी लाखो गॅलन पाणी लागते. आणि मजुरांना त्वचाविकार, कॅन्सर, पोटाचे विकार, दमा आदी रोगांचाही सामना करावा लागतो.
कापडाला रंगरंगोटी (डाइंग) करण्यासाठी जे रसायन वापरल्यामुळे भूजलाचेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे. ऑस्ट्रेलियात विकसित करण्यात येत असलेल्या या कपाशीमुळे रंगरंगोटी करण्याची गरज भासणार नसून पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
कापूस उत्पादकांना संधी?
पांढरा कापूस लवकर काळा किंवा प्रत खराब होण्याची समस्या आहे. रंगीत कापसामुळे ही समस्या दूर होऊन जास्त किमतीत हा कापूस विक्री होईल, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
WEB TITLE: Soon red, golden and purple cotton will appear on the farm; See details …