फळ शेती

काही महिन्यात फळे देणारी कमी खर्चातील “ही” फळझाडे माहीत आहेत का? जाणून घ्या व करा अशी लागवड..

Some annoying fruit growers spend less "Learn and do planting.

भारतातील काही फळ झाडांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. बरीच फळझाडे (Fruit trees) कमी कालावधीत उत्पादनाला येतात. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी पिके शेतकऱ्यांना परडवतात व शेतकरी कमी खर्चात लागवड कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रित करतो व चांगली पिके घेतो. आता तुम्ही कमी खर्चात फळबागा उभारू शकता ते कसे आपण फळझाडांबद्दल जाणून घेऊया पाहूया सविस्तर..

भारतातील कमी खर्चात अधिक वेगाने वाढणारी व काही महिन्यात फळे देणारी फळझाडे पाहुया..

1) पपई –

पपई हे फळ झाड वेगाने वाढते. खर्चही खूप कमी लागतो. लागवडीनंतर काही महिन्यात उत्पादनाला सुरुवात होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पपई फळ झाडांची लागवड केली जाते. अगदी 9 ते 11 या कालावधीत कापणीला येतात. हे फळ पूर्ण पिवळे होण्याआधी तोडावे.

वाचा : जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

2) पेरू –

बियाण्यांमधून पेरूची लागवड केली तर खूप हळू वेगाने वाढतात व फळेही उशिरा येतात. हिच लागवड कलम केलेल्या पेरूची झाडे लावून केली तर 8 ते 9 महिन्यात फळे तोडायला येतात.

3) अंजीर –

या फळ झाडाची कापणी 2 ते 3 वर्षात केली जाते. हे फळ लोह आणि अँटीऑक्सिडंट्सने प्रसिद्ध आहे. यव फळाच्या आत रसाळ कंद आणि कुरकुरीत बिया असतात. लोहाची कमतरता, लो शुगर,रक्तदाब यावर उपयुक्त असते.

4) मनुका –

कापनी 2 ते 3 वर्षात होते. या झाडाची फळे गोल, आयताकृती असतात. रसाळ व चवीला थोडे आंबट असतात. फळे वेगवेगळ्या वेळी पिकू शकतात. सुरुवातीला ते हिरव्या रंगाचे असतात आणि पिकल्यावर ते लाल रंगात बदलतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button