ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

‘या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?

Soil testing with the help of 'this' machine became cheaper and easier; See what are the features of this device?

इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूर च्या कृषी शास्त्रज्ञांनी माती परीक्षण कीट (Kit) तयार केले आहे या किट ची किंमत 6 हजार रुपये असून शेतकऱ्यांना यासाठी 20 ते 25 टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. या किट (यंत्र) च्या सहाय्याने शेतकऱ्यांना मातीचे परीक्षण करता येणार आहे

या किट (यंत्र) च्या सहाय्याने माती मधील नायट्रोजन फॉस्फरस, पोटॅशियम आणि पी एच ची माहिती मिळणार आहे. या किट ची निर्मिती डॉ पाटील, डॉ श्रीवास्तव, डॉक्टर मिश्रा, डॉक्टर दास या साऱ्यांनी अथक परिश्रमातून विकसित केले आहे. या कीट मुळे भविष्यात शेती क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल घडू शकतात. शेतकरी स्वावलंबी होऊन आपल्या शेतामध्ये माती परीक्षण करून घेऊ शकतात. ते हे पिक गांधी कृषी विद्यापीठ रायपूर यांच्यामार्फत विकले जाणार आहे.

या कीट मार्फत मातीच्या आरोग्याची तपासणी होणार आहे. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम एच पी चे मूल्य किती असावे. यामध्ये कोणते खताचा याचा अभाव आहे हे मातीचे रंगावरून अवलंबून ठरते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माती परीक्षण करून माती आरोग्य कार्ड (Soil Health Card) देण्यात आले आहे. हेल्थ कार्ड मध्ये कोणत्या शेतात कोणत्या खताचा अ -भाव आहे हे स्पष्टपणे सांगितले जाते ही चाचणी कारण्यासाठी जिल्ह्यात चाचणी केंद्र स्थापन केले गेले आहेत. तिथे गेल्यास माती परीक्षणाचा निकाल लिहिण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. परंतु या कीट च्या सहाय्याने शेतकरी स्वावलंबी होतील त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा (Money) वाचू शकतो.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button