नाशिक: कोरोनाच्या प्रभावामुळे(Due to the influence of the corona) अनेक बाजार समिती बंद होत्या त्यामुळे अनेक शेतमालाला फटका बसला त्यामध्ये कांदा उत्पादकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे, अशावेळी विशेषता कांदा साठवणुकीची नवीन तंत्रज्ञान (New technology) आत्मसात केल्यास होणारा शेतमालाचा फटका कमी होण्यास मदत होईल,
कांदा साठवून ठेवणे त्याची वखार (Warehouse) निर्माण करणे यासाठी दीड ते दोन लाख रुपये पर्यंत खर्च येतो परंतु हा खर्च कमी करायचा असेल तर काय करायचे यासाठी काही सामान्य शेतकऱ्यांनी नवीन नवीन युक्तीचा वापर करत साठवणुकीसाठी कमी खर्चात कांदा जास्त टिकून राहावा, यासाठी नावीन्यपूर्ण लोखंडी तारेच्या गोलाकार चाळीत कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले आहे.
या पद्धतीमुळे कांदा साठवणुकीसाठीचा खर्च कमी प्रमाणात होतो तसेच कांदा सात ते आठ महिन्यांपर्यंत साठवून राहू शकतो, लॉक डाऊन च्या काळामध्ये अनेक वस्तू कांदा साठवणुकीसाठी मिळत नाही परंतु कमी वेळेत व कमी खर्चात लोखंडी तारेचा गोलाकार चाळीत कांदा साठवणूक केल्यास अधिक फायदेशीर ठरेल
काहीवेळा कांदा साठवणूक करण्यासाठी साधन सामग्री उपलब्ध नसेल तर कांद्याला कमी भाव असूनही बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी नेले जाते, त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे कांदा उत्पादनामध्ये नुकसान होऊ शकते, कमी जागेमध्ये व कमी खर्चामध्ये लोखंडी तारेच्या गोलाकार चाली निर्माण केल्यास हवा मोकळी राहून कांदा टिकण्यासाठी मदत होते,एका कांदाचाळीची उंची उंची सहा फूट व रुंदी चार फूट असते यामध्ये 25 ते 30 क्विंटल कांदा साठवणूक होऊ शकते.
या गोलाकार लोखंडी तारेची कांदाचाळ(Onion of round iron star) तयार करण्याकरिता हजार ते पंधराशे रुपये खर्च येतो. चाळीत कांदा जास्त काळ टिकतो. तसेच याचा दुसरा फायदा देखील आहे तो म्हणजे चाळीचा पुन्हा वापर करता येतो.
हेही वाचा :
सुखद वार्ता! टाफेने (TAFE) ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे एक अनोखी योजना…
शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!