एका कुटुंबातील सहाजणी बहिणी, झाल्या पोलीस दलातील वाघिणी, कोण आहेत या वाघिणी ?
Six Sisters from the Bhosle Family: Success story
मुलगी म्हणजे पराक्याचे धन, वंशाला दिवा हवा. वृद्ध काळात काठी हवी, अशी समाजामध्ये मानसिक असते. परुंतु याच समाजपुढे कोल्हापुरातील वाघावे गावातील या सहा बहिणींनी समाजात एक आदर्श ठेवला आहे. शेती व्यवसाय करत असणारे भोसले कुटुंबामधील एक, दोन, नव्हे चक्क सहजणी पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले या बहिणी पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. (Six sisters from the Bhosle family)
घरची परिस्थिती सामान्य असून देखील त्यावर मात करत पोलीस भरती चा अडथळा ही त्यांनी पार केला. त्यांच्या या यशाला राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी देखली भोसले कुटुंबातील रणरागिणींचे कौतूक केले.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी खास ट्विट करत भोसले कुटुंबातील सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले या सहा रणरागिणींचं अभिनंदन केले आहे.
नातींचा अभिमान…
मला माझ्या नातींचा अभिमान आहे. आम्ही मुलगा मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही. या उलट त्यांनी स्वतः च्या पायावर उभा राहावं. हीच इच्छा होती. आणि ती त्यांनी साकारली. त्या दिवा नसल्यातरी आमच्या वंशाच्या पणती आहेत. असे म्हणत आजीचे काळीज भरून आले. मुलींना संधी मिळाली तर ते नक्कीच त्याच सोनं करून दाखवतात.
(शेतीविषयक माहिती, ताज्या घडामोडी, बाजार भाव, तसेच शेती तंत्रज्ञान, यासाठी आमच्या टेलीग्राम ला चॅनेल फॉलो करा: ) https://t.me/farmersdigitalmagazine
हेही वाचा:
🔻 सुलभ सिंचन मधून विहीर मिळवणे झाले सुलभ..
🔻 ही आहे, शेवटची तारीख PM योजना
🔻सरकार देते शेतकऱ्यांना 3000 रुपये अधिक माहिती साठी इथे क्लिक करा...