नागरी सहकारी बँकां मार्फत घेतलेल्या एक रकमी कर्ज योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी या कर्ज योजनेचा लाभ घेतला मात्र अजून परतफेड करू शकले नाही त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जा मधील प्रभावी वसुलीसाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनास शिफारस केल्याप्रमाणे एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास यापूर्वी वेळोवेळी शासनाने मंजुरी दिलेली आहे.
नागरी सहकारी बँकांचे वाढते NPA कमी करण्याच्या दृष्टीने एकरकमी कर्ज परतफेड योजनेत वेळोवेळी मुदतवाढ दिल्यामुळे नागरी बँकांचे NPA कमी होण्यासाठी आतापर्यंत मदत झाली आहे. बँकांच्या थकबाकीदारांना या योजनेत सहभागी करून थकीत कर्ज खाती बंद करून बँकांचा ताळेबंद सुधारण्यासाठी तसंच
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरी सहकारी बँकांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना योजनेला मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 31 मार्च 2022 पर्यंत राहील.
31 मार्च 2019 अखेर जी कर्ज खाती बुडीत वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील अशा सर्व कर्ज खातेदारांना ही योजना लागू होणार आहे. 31 मार्च 2019 अखेर अनुत्पादक कर्जाच्या सब स्टॅंडर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या आणि नंतर संशयित आणि बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्ज खात्यांना देखील ही योजना लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत निर्णय घेण्यात येईल हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..