हवामान
अवकाळी पाऊस पुन्हा येण्याची चिन्हे ‘पहा’ कोणत्या जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस..
Signs of unseasonal rains coming again 'Look' in which district unseasonal rains will fall ..
सध्या उष्णतेची लाट वाहत असतानाच हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा आलेला आहे. येत्या शुक्रवारपासून मराठवाडा विदर्भासह मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
त्याचबरोबर या आठवड्यातील शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसाचा दणका होण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर गडचिरोली,गोंदिया, नागपूर,वर्धा,यवतमाळ,कोल्हापूर परभणी,हिंगोली, नांदेड,जालना,अकोला, अमरावती बुलढाणा, गडचिरोली,गोंदिया वाशीम या ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत असे हवामान खात्याने सांगितले आहे.
त्याचबरोबर पुणे,कोल्हापूर,सातारा, सांगली, सोलापूर विजेच्या कडकडाटासह तुरळक सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे.