ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

धक्कादायक; “या” ठिकाणी अफूच्या शेतीनंतर पिकवली गांजा शेती, पोलिसांनी उचलले हे पाऊल..

शेतकरी (Farmers) शेतामध्ये नवनवीन पिके (crop) घेऊन उत्पादनात वाढ करत असतो. उत्पादन (Production) वाढवण्याच्या नादात काही कायदेशीर नियम देखील मोडत असतो. अशाच गांजा शेतीबद्दलची (Cannabis farming) माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यात गांजाची सामूहिक शेती (farming) करत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे.

वाचा –

शेतामध्ये (farming) गांजा पिकवला जात असल्याच्या माहितीने खळबळजनक वातावरण झाले आहे. या धक्कादायक प्रकारात दोघांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.

या ठिकाणी अफूची देखील शेती केली गेली होती –

याआधीही शेतकऱ्यांनी चक्क अफूची शेती (farming) पिकवली होती. या प्रकरणा वेळी देखील भयंकर वातावरण तयार झाले होते. गेल्या काही वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील मोहा या गावात शेकडो एकरावर अफूची सामूहिक शेती (farming) होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामध्ये शंभर पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

वाचा –

गांजा शेती आढळून आली –

आता पुन्हा याच तालुक्यात गांजाची शेती (Cannabis farming) आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ वातावरण झाले आहे. परळी मतदारसंघातील हाळंब या गावात गांजाची सामूहिक शेती (farming) केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी या शेतीवर (farming) छापा घातला असता सामूहिक गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button